बॉलीवूड फिल्मी जगतातील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा चित्रपटांपासून दूर असून देखील लाइमलाइटमध्ये राहत असते. परंतु तिला नेहमी कोणत्याना कोणत्या इव्हेंटमध्ये पाहिले जाते. खास गोष्ट हि आहे रेखा जिथेही जाते तिथे ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. इतकेच नाही तर रेखा अनेक वेळा रियालिटी शोमध्ये सुद्धा दिसली आहे.

नुकतेच रेखा रिंकू राकेश नाथच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टी पोहोचली होती. खास गोष्ट हि आहे कि ती या फंक्शनमध्ये एकटीच आली नव्हती तर तिची बहिण राधासुद्धा तिच्यासोबत होती. पार्टीमध्ये रेखाला तिची बहिण राधा उसमान सईदसोबत पाहिले गेले. यादरम्यान राधासुद्धा आपली बहिण रेखा सारखी कांजीवरम सूटमध्ये पाहायला मिळाली. तिने केसामध्ये गजरा आणि भांगामध्ये टीकासुद्धा लावला होता. अशा लुकमध्ये राधा हुबेहूब तिची बहिण रेखासारखी दिसत होती.पार्टीमध्ये राधा आणि रेखा इतर पाहुण्यांना भेटताना दिसली. या पार्टीमध्ये रेखा आणि तिची बहिण राधा शिवाय बॉलीवूड जगतातील जीतेंद्र, राकेश रोशन, जॅकी श्रॉफ, जॉनी लीवर आणि माधुरी दीक्षितसुद्धा सामील झाले होते. याआधी रेखा आणि राधा एकत्र अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीमध्ये देखील पोहोचल्या होत्या. या दरम्यान रेखाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. इतकेच नाही तर पार्टीमध्ये दोन्ही बहिणींनी मिडियाला एकत्र पोज देखील दिल्या.
या दोघी बहिणींना एकत्र याआधी कधीही पाहिले गेले नव्हते. परंतु नुकतेच दोन्ही बहिणी एकत्र एकाच ठिकाणी स्पॉट केल्या गेल्या. राधाने साउथच्या चित्रपटामध्ये काम केले आहे. परंतु लग्नानंतर तिने चित्रपट करणे सोडून दिले आणि ती अमेरिकेला जाऊन स्थाईक झाली. राधाने आपला लहानपणीचा मित्र आणि मॉडल उस्मान सईदसोबत लग्न केले आहे.