बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत केसमध्ये प्रत्येक दिवशी नविन खुलासे होत आहेत. मुंबई पोलिसांच्या नंतर जिथे रिया चक्रवर्तीची ईडी चौकशी करत आहे तिथे पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून मीडिया रिपोर्टमध्ये रिया द्वारे केल्या गेलेल्या कॉल डीटेल्सची माहिती समोर आली आहे. असे म्हंटले जात आहे की या माहितीमध्ये समोर आले आहे की रियाने सुशांतला वर्षभरामध्ये फक्त १४२ कॉल्सच केले. तर सर्वात जास्त कॉल्स रियाने आपली आई आणि भावाच्या नंबरवर केले होते.रिपोर्ट्सनुसार असे सांगितले जात आहे की रियाने जिथे सुशांतला वर्षभरामध्ये १४२ वेळा कॉल्स केले तिथे त्याच्या स्टाफला ५०२ वेळा कॉल्स द्वारे बातचीत केली. याबरोबर रिया चक्रवर्तीने वर्षभरामध्ये सर्वात जास्त कॉल्स आपल्या आईला केले. रियाने आपल्या आईला वर्षभरामध्ये ८९० वेळा कॉल्स केले होते. याचबरोबर तिने आपला भाऊ शौविकला ८०० वेळा फोन केला. सुशांतच्या सेक्रेटरीसोबत देखील रिया बातचीत करत होती. सूत्रांच्या माहितीनुसार रियाने गेल्या एक वर्षभरामध्ये सुशांतच्या सेक्रेटरीसोबत १४८ वेळा बातचीत केली होती. अशामध्ये हे स्पष्ट आहे की सुशांतला सर्वात कमी कॉल केले गेले होते.ही केस आता सीबीआईकडे ट्रांसफर झाली आहे. या प्रकरणामध्ये आज रिया चक्रवर्तीची ईडी चौकशी करत आहे. ३१ जुलैला ईडीने रिया आणि तिच्या कुटुंबाच्या सदस्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केली होती. हे प्रकरण दिवंगत अभिनेता सुशांतच्या खात्यामधून १५ करोड रुपयाच्या संदिग्ध देवाणघेवाणी संबंधी आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी रिया आपला भाऊ शौविक चक्रवर्तीसोबत ईडीच्या कार्यालयात पोहोचली होती.याबद्दल रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी ईडीला विनंती केली होती की सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण चालू होईपर्यंत ईडीने या प्रकरणात रियाची चौकशी करू नये. पण ईडीने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला आहे. १२ वाजता ईडीने रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावले होते, ज्यासाठी आपला जबाब नोंदवण्यासाठी रिया चक्रवर्ती ईडीसमोर हजर झाली आहे आणि या दरम्यान रियाची ८ तासांपेक्षा जास्त चौकशी केली गेली.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.