९ तास चौकशीनंतर अशी झाली होती रियाची हालत, ईडीच्या कार्यालयामधून बाहेर येताच कारकडे धावली !

2 Min Read

९ तास चौकशीनंतर ईडी ऑफिसमधून निघाली रिया चक्रवर्ती. रिया जेव्हा ईडीच्या कार्यालयामधून बाहेर येत होती तेव्हा तिची हालत चांगलीच खराब झालेली पाहायला मिळाली होती. पायऱ्यावरुन उतरण्यासाठी तिला लेडी पोलिसाची मदत घ्यावी लागली होती. बाहेर येताच मिडियाने तिला घेरले. यादरम्यान ती कशीतरी आपल्या कार पर्यंत पोहोचण्याच्या गडबडीत दिसली. ती पळण्याच्या स्थितीमध्ये तिथून निघाली. कारण ती ज्यांच्याद्वारे घेरली होती त्यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये हलफनामा दाखल करून आली होती. रिया मिडियावर खूपच नाराज आहे. अशामध्ये जेव्हा मिडियाद्वारे घेरली गेली तेव्हा कशीतरी ती पळण्याच्या स्थितीमध्ये दिसली. रियाने म्हंटले – सुप्रीम कोर्टाच्या सीबीआयकडे केस ट्रांसफर करण्यात काहीच अडचण नाही.यादरम्यान सिद्धार्थ पीठानीदेखील प्रवर्तन निर्देशालयाच्या कार्यालयामध्ये पोहोचला. पीठानी सुशांतसोबत फ्लॅटमध्ये राहत होता. याचबरोबर ज्यावेळी सुशांतने आ*त्म*ह*त्या केली तेव्हा तो घरामध्येच उपस्थित होता. प्रवर्तन निदेशालयाच्या कार्यालयामध्ये यावेळी रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, श्रुति मोदी आणि आता सिद्धार्थ पीठानीची चौकशी करण्यात आली.सूत्रांनुसार रियाने उत्पन्नाविषयी दिलेल्या उत्तरांमध्ये खूपच फरक आढळून आला आहे. रियाची वार्षिक कमाई १८,७५,१०० होती. २०१८-१९ मध्ये हि वार्षिक कमाई १८,३३,२७० झाली. रियाची २०१७-१८ मध्ये बाहेरच्या सोर्सकडून होणारी कमाई २०१७-१८ मध्ये १,२७,६२५ इतकी होती पण अचानकच २०१८-१९ मध्ये ती वाढून २,३८,३३४ इतकी झाली.आणखी एक महत्वाची गोष्ट रियाच्या आयटीआरमध्ये पाहायला मिळाली आहे. ज्यामध्ये तिची फिक्स्ड एसेट्स २०१७-१८ मध्ये ९६,२८१ आहे तर २०१८-१९ मध्ये हि फिक्स्ड एसेट्स वाढून ९,०५,५९७ इतकी पोहोचली आहे. हे एक खूपच मोठे अंतर आहे.सूत्रांनुसार ईडी सुशांत कडून रियाला मिळालेल्या गिफ्टबद्दल विचारपूस करू शकते. काही अशाप्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सुशांतने तुम्हाला जे गिफ्ट दिले होते ते गिफ्ट कोणते होते? कितीचे होते? तुम्ही देखील सुशांतला गिफ्ट दिले होते का? केव्हा आणि काय होते? त्याचे पैसे कोठून तुमच्याजवळ आले?
ईडीच्या टीमने आज रिया चक्रवर्तीला अनेक बँक अकाउंट, कंपनी आणि इतर प्रॉपर्टीसंबंधित कागदपत्रांसोबत बोलावले होते. यासोबत सर्व ओळखपत्रे जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, डीआयएन नंबर संबंधित कागदपत्रे, कंपनी आणि त्या संबंधित आपसातील अॅग्रीमेंटची कागदपत्रे, आयटीआर संबंधित कागदपत्रांसोबत चौकशीसाठी बोलावले गेले होत.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *