बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्यापासून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. रोज नवनवीन खुलासे होऊन नवीन माहिती समोर येत असल्यामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. रिया चक्रवर्ती वर सुशांतवर जादूटोणा आणि औषधे व ड्रग्ज देण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच एका न्यूज पोर्टलला मुलाखत दिली. रियाने न्यूज पोर्टलला मुलाखात देऊन तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर रियाने सुशांत सिंग राजपूत परिवारावर गंभीर आरोप देखिल लावले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती चांगली वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रियाने दिलेल्या मुलाखतीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. या मध्ये रियाने सुशांत आणि तिच्या बाळाबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे.होय मला सुशांत कडून बाळा होतं :- रिया चक्रवर्ती ने या मुलाखतीत सांगितले की आम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिले होते आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ आणि सुशांतकडून मला एक बाळ हवं होतं जे दिसायला अगदी सुशांतसारखं दिसलं पाहिजे व मी त्याला लिटल सुशी म्हणून हाक मारणार असल्याचे सांगितले होते. आम्ही नेहमीच एका कपल सारखे बोलत होतो आणि आमच्या मैत्रीचे कधी प्रेमात रुपांतर झाले हे आम्हादोघांना समजलेच नाही. मला चांगले आठवते की आमची शेवटची भेट कशी झाली होती. सुशांतने सर्वप्रथम मला प्रपोज केलं होतं व माझ्या आयुष्यात येणाऱ्या मुलांमध्ये सुशांत हा सर्वात इमानदार मुलगा होता आणि सुशांतचे वडिलांसोबत संबंध ठीक नव्हते त्यामुळे प्रशांत नेहमीच चिंतेत राहत होता.रिया पुढे म्हणाली की मला एकाच गोष्टीचं दुःख वाटतंय की मी सुशांत सिंग राजपूतची एवढी काळजी घेऊन त्याला डिप्रेशन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. पण उलट मलाच त्याच्या मृत्यूला जबाबदार समजले जात असल्याचे तिने म्हटले आहे. माझे सुशांतवर जीवापाड प्रेम आहे होते व असेच राहणार आहे व त्याचेही माझ्यावर प्रेम होते. त्याच्या अचानक जाण्यामुळे मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सुशांतच्या जाण्यामुळे त्याच्या घरच्यांनी मला सर्वात जास्त त्रास दिला आहे व माझं जगणंही मुश्किल केलं आहे असा आरोप रिया चक्रवर्तीने केला आहे.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.