अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरुद्ध पैशांची फसवणूक केल्याबद्दल आरोप लावल्यानंतर ईडीने रियाची तब्बल आठ तास कसून चौकशी केली. यादरम्यान रियाच्या संपत्तीबद्दल देखील जाणून घेण्यात आले. त्याचबरोबर चौकशीदरम्यान रियाने आपल्या जवळ सुशांतच्या या दोनच वस्तू माझ्याकडे असल्याचे सांगितले. या दोन वस्तूंमध्ये सुशांतने एका पानावर लिहिलेला मजकूर आणि एक पाण्याची बाटली ज्यावर छिछोरे असे लिहिले आहे सामील आहेत.सुशांतने डायरीमध्ये काही लोकांचे आभार मानताना एक मजकूर लिहिला होता, ज्यामध्ये रिया कुटुंबियांसमवेत सुशांतचा डॉग फजचा उल्लेख करण्यात आला आहे. सुशांतने यामध्ये लिहिले आहे की मी माझ्या लाईफसाठी आभारी आहे. माझ्या आयुष्यातील लील्लूसाठी आभारी आहे. माझ्या आयुष्यातील बेबूसाठी आभारी आहे. माझ्या आयुष्यातील सरांसाठी आभारी आहे. माझ्या आयुष्यातील मॅडमसाठी आभारी आहे. माझ्या आयुष्यातील फजसाठी आभारी आहे. माझ्या आयुष्यातील प्रेमासाठी आभारी आहे.या मजकुराबद्दल सांगताना रिया म्हणाली की, लील्लू म्हणजे माझा भाऊ, बेबू म्हणजे मी, सर म्हणजे माझे वडील, मॅडम म्हणजे माझी आई आणि फज म्हणजे सुशांतचा कुत्रा आहे. सुशांतने हा मजकूर कधी लिहिला होता याबद्दल अजून काही माहिती समोर आलेली नाही. सुशांतच्या या दोनच वस्तू माझ्याजवळ असल्याच रियाने स्पष्ट केले.दरम्यान सीबीआयने रिया चक्रवर्ती सहित सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, माजी मॅनेजर श्रुती मोदी यांचा समावेश आहे.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.