बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह हा चांगला अभिनेता तर होताचं सोबतच ते एक उत्कृष्ट डान्सर पण होता . सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्याने मुंबई येथील आपल्या राहत्या घरामध्ये आपली जीवनयात्रा संपवली. त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीबद्दल सध्या खूपच उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. या दोघांमध्ये मतभेद होते अशा देखील बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर सुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवसांअगोदर रिया सुशांतचे घर सोडून निघून गेली होती असे देखील सांगण्यात येऊ लागले होते पण लेखी सुहारिता सेनगुप्ता यांनी एका मुलाखतीदरम्यान रियाने सुशांतचे घर सोडण्याचा खुलासा केला आहे.दिग्दर्शक महेश भट यांची सहकारी असलेल्या लेखिका सुहारिता सेनगुप्ता यांनी एका वेबसाईटशी बोलताना याचा खुलासा केला आहे. यादरम्यान तिने सांगितले कि सुशांत खूपच बोलका होता, त्याचे नॉलेज देखील उत्कृष्ठ होते. सडक २ चित्रपटासाठी ज्यावेळी तो महेश भट यांना भेटण्यासाठी आला होता त्यावेळी माझी आणि त्याची भेट झाली होती. खूपच कमी वेळामध्ये दोघांमध्ये बऱ्याच विषयावर चर्चा झाली होती. पण त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर उदासीनता स्पष्ट दिसत होती आणि ती मुकेश भट यांच्या नजरेमध्ये आली. त्यावेळी सुशांतची अवस्था परवीन बाबीसारखीच होण्याच्या मार्गावर आहे असे त्यांनी बोलून देखील दाखवले होते.
सुहारिता सेनगुप्ता यांनी पुढे सांगितले कि, गेल्या काही दिवसांपासून सुशांतवर उपचार चालू आहे. यादरम्यान निराशेमध्ये जाणाऱ्या सुशांतला बाहेर काढण्याचा रियाने खूपच प्रयत्न केला होता. सुशांतने वेळेवर औषधे घेण्यासाठी ती नेहमी प्रयत्न करायची. पण त्याने औषधे घेणे बंद केले होते त्यामुळे त्याच्या आजारामध्ये आणखीनच वाढ झाली. गेल्या वर्षभरामध्ये त्याने हळू हळू इतरांशी संपर्क ठेवणे बंद केले. परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत रियाने सुशांतला खूप सांभाळून घेतले.
सुहारिता म्हणाली कि एक वेळ अशी आली होती कि त्याला माणसांचे भास होऊ लागले होते. एक दिवस सुशांत आणि रिया अनुराग कश्यप यांचा चित्रपट पाहत बसले होते आणि तो अचानक उठला आणि म्हणाला कि मी अनुरागची ऑफर नाकारली आहे आणि आता तो मला मारायला येणार. यामुळे रियाला खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर रिया सुशांतसोबत राहण्यास घाबरू लागली आणि शेवटी तिला सुशांतचे घर सोडण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. यादरम्यान भट यांनी रियाला सांगितले कि तू आता काहीही करू शकणार नाहीस जर तू त्याच्यासोबत राहिलीस तर त्याचा परिणाम तुझ्यावर देखील होईल.
यानंतर सुशांतची बहिण तिथे येऊन त्याची काळजी घेऊ लागली. सुशांतच्या बहिणीने त्याची हर तर्हेने काळजी घेतली. पण तो कोणाचेही ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. तो कोणालाही त्याच्या जवळ देखील येऊ देत नव्हता. यामुळेच त्याने असे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.