ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप नेत्या असलेल्या रूपा गांगुली यांनी नुकताच एक खळबळजनक आरोप केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*सं*बंधी तिने काही महत्वाचा खुलासा केला आहे. तिने आरोप केला आहे कि सुशांतच्या सोशल मिडिया अकाऊंटशी कोणीतरी छेडछाड करत आहे. रूपा गांगुली यांनी याआधी देखील सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये संबंधी कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. पण आता त्यांनी चक्क सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*सं*बंधी पुरावे नष्ट करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.रूपा गांगुली यांनी सोशल मिडियावर शेयर केलेल्या त्यांच्या व्हिडिओमध्ये सुशांतच्या सोशल मिडिया अकाऊंट वरून गोष्टी डिलीट होत असल्याचे उघड केले आहे. त्याचे अकाऊंट कोणीतरी वापरत असल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी म्हंटले आहे कि आधी मला देखील विश्वास बसत नव्हता पण ज्यावेळी मी स्वत: स्क्रीनशॉट पाहिले तेव्हा मलादेखील धक्का बसला. त्याचे अकाऊंट कोणीतरी वापर आहे? पोलीस आहेत का कोणी इतर? सर्व पुरावे नष्ट केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे देण्यात येणार का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. या ट्विटमध्ये रूपा गांगुली यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले आहे.सामान्य नागरिकांना या प्रकरणाबाबतीत पुरेशी माहिती पुरवली जात नाही आहे असा देखील आरोप यावेळी त्यांनी लावला आहे. अन्य कोणाचे हाताचे ठसे कपड्यांवर किंवा त्या ठिकाणी आढळून आले? यासारख्या गोष्टींची माहिती मिळाल्यास या घटनेबाबत वेगळीच माहिती समोर येऊ शकते. असे देखील रूपा गांगुली यानी म्हंटले आहे.तर रूपा गांगुली यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये फॉरेन्सिक टीम दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ जून रोजी घटनास्थळी का गेली असा देखील प्रश्न उपस्थित केला आहे. यादरम्यान पुराव्यांमध्ये छेडछाड करण्यासाठी बराच अवधी मिळाला असणार असे देखील त्या म्हणाल्या. एक जागरूक व्यक्ती म्हणून आपल्याला याबाबतीत सर्व खरी माहिती मिळायलाच हवी त्याचबरोबर आणखीन काही प्रश्न अनुत्तरीत आहेत अशी अपेक्षा देखील त्यांनी केली आहे.रूपा गांगुली यांनी सुशांतच्या इस्टाग्राम अकाऊंटबद्दल शंका व्यक्त केली असतानाच दुसरीकडे सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*च्या पोलीस चौकशीमध्ये प्रत्येक दिवशी वेगळीच माहिती समोर येत आहे. आतापर्यत पोलिसांनी एकूण २३ जणांची या प्रकरणाबाबतीत चौकशी केली आहे. आता पोलिसांनी आपला तपास सुशांतच्या सोशल मिडिया अकाऊंटकडे वळवला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरला एक पत्र देखील पाठवले आहे. यामध्ये पोलिसांनी ट्विटरकडून सुशांतच्या अकाऊंटबाबतीत गेल्या सहा महिन्यांची माहिती मागवली आहे. सुशांतच्या ट्विटर अकाउंटवरुन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटचे ट्विट करण्यात आले होते असे दिसून येत आहे.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.