https://www.hindustantimes.com

केवळ भारतातच नाही तर जगभरात क्रिकेट कोणामुळे ओळखलं जात असेल तर त्यात सचिनचं नाव आघाडीवर घेतला जातं. भारतातच नाही तर जगभरात सचिनचे अनेक चाहते आहेत. सचिनला आजही खेळताना पाहावं अशी प्रत्येक क्रिकेटप्रेमींची इच्छा असते. अनेक जण यासाठी प्रार्थना करतात की पुन्हा सचिनला मैदानात पाहता यावे. यावर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडसोबत भारत हारत असताना अनेकांना सचिनची आठवण झाली होती. सचिन असता तर आपण ही मॅच नक्की जिंकलो असतो अशी सचिनच्या चाहत्यांची भावना होती. तुम्ही सुद्धा सचिनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी देखील ही बातमी आहे फक्त बातमी नाही तर एक खास बातमी.

https://images.firstpost.com

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. होय, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानात बॅटिंग करताना तुम्हाला दिसणार आहे. आम्हाला खात्री आहे ही बातमी ऐकून तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. मात्र तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की असं कसं शक्य आहे? खरं तर नियमानुसार हे चुकीचे आहे, असा विचार देखील तुमच्या मनात आला असेल. पण काळजी करू नका ही बातमी अगदी खरी आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात टी ट्वेंटी सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे. या सीरिजमध्ये सचिन तेंडुलकर वीरेंद्र सेहवाग यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असणार आहे. त्यामुळे सचिन- सेहवागची जोडी पुन्हा एकदा तुमचं मनोरंजन करणार आहे. भारतीय संघात असताना सुद्धा या ओपनिंग जोडीने चौफेर फटकेबाजी करत नेहमीच त्यांच्या फॅन्सना खुश केलं आहे. या सिरीजच्या निमित्ताने पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात मैदानात उतरेल सचिन तेंडुलकर

https://www.hindustantimes.com

रोड सेफ्टी सिरीजमध्ये जगभरातील दिग्गज आजी- माजी खेळाडू सहभागी होणार आहेत. आतापर्यंत जगभरातील सात टीम या सीरिजमध्ये खेळण्यासाठी तयार झाल्या आहेत. क्रिकेट रसिकांसाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे ही सिरीज भारतात होणार आहे आणि या सिरीजमध्ये जगभरातील अनेक देश सहभागी होणार आहेत. याचाच अर्थ थोडक्यात ही सिरीज वर्ल्डकप सारखी होईल असं म्हटलं जातंय. ही सिरीज 6 फेब्रुवारीला सुरू होणार असून सहा दिवस चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या सीरिजमध्ये सचिन तेंडुलकर सोबत जगभरातील दिग्गज खेळाडू दिसणार आहेत, असे खेळाडू ज्यांनी आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली होती, असे खेळाडू ज्यांचे आजही लाखो फॅन्स आहेत. तर मग तुम्ही सुद्धा नक्कीच उत्सुक असाल आपल्या लाडक्या मास्टर ब्लास्टरला आणि जगभरातील या दिग्गज खेळाडूंना पुन्हा मैदानात पाहण्यासाठी.

पुन्हा दिसणार सचिन आणि वीरूची जोडी

https://akm-img-a-in.tosshub.com

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सिरीजमध्ये सचिन तेंडुलकर शिवाय वीरेंद्र सेहवाग सुद्धा खेळणार आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा रसिकांसाठी ही एक अनोखी पर्वणीच असेल. क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांना या खेळाडूंची खूप उणीव भासत होती. त्यामुळे या दोघांना एकत्र खेळताना पाहण्याची संधी या चाहत्यांना पुन्हा एकदा मिळणार आहे. हे दोघे खेळाडू एकाच टीमसाठी खेळणार असल्याची माहिती मिळत असून ओपनिंग जोडीच्या स्वरूपात आहे दोघ खेळणार आहेत. आजवर भारतासाठी ओपनिंग जोडीच्या स्वरूपात खेळताना या दोघांनी अनेक ऐतिहासिक खेळी साकारल्या आहेत. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी प्रत्येक वेळी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यामुळे तीच दहशत या सीरिजमध्येही पाहायला मिळते का हे रंजक ठरणार आहे.

पुन्हा रंगणार भेटली आणि सचिनचा सामना

https://resize.indiatvnews.com

ऑस्ट्रेलियाचा यशस्वी गोलंदाज ब्रेटली सुद्धा सहभागी होणार आहे. त्यामुळे सचिनचा सामना पुन्हा एकदा ब्रेट ली सोबत असणार आहे. इतकंच नाही तर ब्रायन लारा सुद्धा या सीरिजमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे ही सिरीज चर्चेत असणार एवढं नक्की. सचिन तेंडुलकरसोबत अनेक दिग्गज खेळाडू असल्यामुळे याची चर्चा तर होणारच यात तिळमात्रही शंका नाही. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा यात सहभाग असल्यामुळे या सीरिजची लोकप्रियता अधिकाधिक वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे.