बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने पहिला १९९१ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री अमृता सिंह सोबत लग्न केले होते. यानंतर २००४ मध्ये ते वेगळे झाले आणि नंतर २०१२ मध्ये सैफने दीर्घ रिलेशननंतर करीनासोबत लग्न केले. आज त्यांची जोडी बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. आज आपण त्यांच्या लव्ह स्टोरी बद्दल जाणून घेणार आहोत.सैफ आणि करीनाची भेट २००८ मध्ये झाली होती. त्यावेळी तो डायरेक्टर विजय कृष्णा आचार्यचा चित्रपट टशनची शुटींग करत होता. चित्रपटामध्ये करीना आणि सैफ शिवाय अक्षय कुमार आणि अनिल कपूरदेखील मुख्य भूमिकेमध्ये होते. तसे बॉक्स ऑफसवर हा चित्रपट जास्त सफल झाला नाही. पण सैफ करीनाची जोडी बनली.चित्रपटादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट केले. नंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या लग्नाचा प्रवास इतका सोपा नव्हता. करीनाने आपल्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि ते पळून जावून लग्न करण्याचा प्लान बनत होते.इतकेच नाही तर करीनाने हे देखील सांगितले कि त्यांच्या कुटुंबाने आणि काही लोकांनी त्यांना खूपच समजावले होते. म्हंटले होते कि सैफ २ मुलांचा पिता आहे, वयाने मोठा देखील आहे. माहित नाही काय की, पण करीनाने ऐकले नाही तिने निर्णय घेतला होता. करीनाने सांगितले कि त्यांनी कुटुंबाला सांगितले होते कि जर मिडियामध्ये त्यांच्या लग्नाची चर्चा झाली तर ते पळून जातील.करीनाने हे देखील सांगितले कि सैफसोबत लग्न करण्यापूर्वी त्यांनी सैफच्या समोर एक अट ठेवली होती. तिने म्हंटले होते कि सैफला आपला जोडीदार यासाठी निवडले होते कि तिला एका आत्मनिर्भर महिलेप्रमाणे राहायचे होते. तिला लग्नानंतर देखील काम करायचे होते आणि सैफ या गोष्टीसाठी तयार होता.करीनाने सैफच्या आधी शाहिद कपूरला बराच काळ डेट केले होते. तर सैफने करीनाच्या अगोदर अमृतासोबत लग्न केले होते. अमृता सैफपेक्षा १२ वर्षाने मोठी होती. यामुळे सैफचे कुटुंबीय त्याच्या लग्नाच्या विरुद्ध होते. यामुळे सैफ आणि अमृताने गुपचूप लग्न केले होते. अमृता आणि सैफचे दोन मुले आहेत, सारा आणि इब्राहिम.