सैफ अली खान आणि अमृताची लव्हस्टोरी आपल्या सर्वांना चांगलीच माहिती असेल. सैफ अली खानने स्वतःपेक्षा १३ वर्षाने मोठ्या असलेल्या अमृता सिंहसोबत लग्न केले होते. तथापि जेव्हा त्यांच्या घटस्फोटाची बातमी मिडियामध्ये आली होती तेव्हा सर्वांनाच हैराणी झाली होती. सैफ आणि अमृता यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधीत अनेक किस्से आहेत. सैफ अली खान मैं खिलाड़ी तू अनाड़ी चित्रपटाच्या प्रीमियरसाठी गेला होता.

यादरम्यान सैफ अली खानला चारही बाजूने चाहत्यांनी घेरले होते. अशातच एका फीमेल फॅनने त्याच्यासोबत डांस करण्याची रिक्वेस्ट केली जी सैफ अली खानने स्वीकार केली आणि तो त्या मुलीसोबत डांस करू लागला. परंतु त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला हि गोष्ट आवडली नाही आणि त्याचा आणि सैफ अली खानचा वाद झाला. यादरम्यान बॉयफ्रेंडने सैफला जोरात ठोसा मारला यामुळे एकच खळबळ उडाली.तरीही सैफने पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. परंतु सैफला नंतर समजले कि त्याची पत्नी अमृताला सुद्धा हि गोष्ट बिलकुल पसंत नाही आली. या कारणामुळे सैफ अली खानला कॅमेऱ्यासमोर माफी मागावी लागली. आणि त्याचबरोबर असे देखील म्हणाला कि असा प्रकार माझ्याकडून पुन्हा कधीच घडणार नाही.सैफ अली खानने जेव्हा लग्न केले होते त्यावेळी तो फक्त २१ वर्षांचा होता आणि अमृताचे वय ३३ वर्षे होते. सैफ अली खान पहिल्याच नजरेत अमृता सिंहच्या प्रेमात पडला होता. दोघांनी भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती जिथे अमृता फोटोसेशन करण्यास आली होती. दोघांचे लग्न १३ वर्षे चालले. परंतु परस्पर मतभेदामुळे दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर २०१२ मध्ये सैफ आली खानने करीना कपूरसोबत लग्न केले.