बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सैफ अली खानसाठी २०२० हे वर्ष खूपच चांगले राहिले आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या तानाजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सफलता मिळवली होती. तर जवानी जानेमनने देखील त्याच्या मागच्या चित्रपटांपेक्षा उत्कृष्ठ बिजनेस केला आणि आता तो लवकरच पुन्हा पिता देखील बनणार आहे. आता सैफसंबंधित आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यासाठी तो ट्विटरवर देखील ट्रेंड करत आहे.करीनाने शेयर केला पोस्टर :- लवकरच फिल्मी पडद्यावर सैफ अली खान आणि बाहुबली फेम प्रभासदरम्यान जबरदस्त मुकाबला होणार आहे. होय हे दोघे आदिपुरुष चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. इकीकडे जिथे या चित्रपटामध्ये प्रभास मुख्य अभिनेता असेल तर दुसरीकडे सैफ अली खान एक भयानक खलनायक म्हणून दिसणार आहे. या चित्रपटाचे डायरेक्शन ओम राऊत करणार आहेत. करीना कपूर खानने आदिपुरुषचे एक नवे पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केले आहे. ज्याला खूपच पसंती मिळत आहे.
भूत पुलिस मध्ये देखील पाहायला मिळणार :- याशिवाय सैफ अली खान एक हॉरर-कॉमेडी चित्रपट भूत पुलिस मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये सैफशिवाय अर्जुन कपूर आणि फातिमा सना शेख देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. हा चित्रपट पवन कृपलानी डायरेक्ट करणार आहेत तर याचे प्रोड्युसर रमेश तौरानी आणि आकाश पुरी आहेत. अर्जुन याआधी पहिला सैफची पत्नी करीना कपूर खानसोबत २०१६ मधील हिट चित्रपट की एंड का मध्ये पाहायला मिळाला होता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.