देशभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे २१ दिवसांचा लॉकडाउन केला गेला आहे. बॉलीवूड मधील कलाकार देखील आपल्या कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवत आहेत. पण यादरम्यान आम्ही तुम्हाला सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक किस्सा सांगणार आहोत जो त्याच्या लहानपणीचा आहे. जेव्हा सलमानने आपल्या वडिलांच्या पगाराच्या पैशाला आग लावली होती. यानंतर सलीम खानने सलमान खानला असा धडा शिकवला ज्याची सलमानला अजूनदेखील आठवण आहे.

सलमानच्या लहानपणी त्याचे कुटुंब इंदोरमध्ये राहत होते. सलमान लहानपणी खूपच खोडकर होता. तो आपल्या भावा बहिणीसोबत नेहमी मस्ती करत असायचा. दिवाळीच्या दिवशी त्याने एक खूप मोठी चूक केली होती. सर्व लोक मिळून एकत्र कागद पेटवत होते. पण नंतर कागद संपले तेव्हा सर्व लोक आजूबाजूला कागद शोधू लागले.सलमान पण आजूबाजूला कागद शोधत होता परंतु त्याला मिळाला नाही. त्यानंतर त्याला वडिलांच्या खोलीमध्ये ठेवलेला एक कागदाचा बंडल सापडला जो सलामन उचलून घेऊन बाहेर आला आणि आपल्या भाऊ बहिणीसोबत त्याने तो कागदाचा बंडल जाळण्यासाठी दिला. पण सलमानला हे माहिती नव्हते कि तो एक कागदाचा बंडल नसून तो एक पैशांचा बंडल होता. जो त्याचे वडील सलीम खान यांचा पगार होता.सलमानने आपल्या भाऊ बहिणीसोबत मिळून ते सर्व पैसे आगीमध्ये जाळून टाकले. ते सर्व पैसे मिळून ७५० रुपये होते जो सलीम खान यांचा महिन्याचा पगार होता. यानंतर जेव्हा सलीम खान यांना हि सर्व हकीकत कळाली तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांना रागावले नाही तर त्यांनी त्या जाळलेल्या पैशांची किंमत त्यांना समजावून दिली. याचा जास्त करून सलमान खानवर चांगलाच परिणाम झाला आणि तेव्हापासून तो एक व्यावहारिक व्यक्ती बनला आणि सलमानला हि गोष्ट आयुष्यभर आठवणीत राहिली.