सलमान खान आज बॉलीवूडमधील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. सलमान खानचा प्रत्येक चित्रपट हिट होतोच, दबंग चित्रपटानंतर सलमानचे अनेक चित्रपट आहेत जे १०० ते ३०० करोड पर्यंत कमाई केले आहेत. सलमान खान नेहमी आपल्या चित्रपटांमुळे चर्चेमध्ये राहत असतो, अनेक वेळा त्याच्यासंबंधित अनेक किस्से सोशल मिडियावर व्हायरल होत असतात, काही काळापूर्वी सलमान संबंधित एक बातमी सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनली होती.

आम्ही सलमानच्या ज्या किस्याष बद्दल बोलत आहोत तो सलमानचा पहिला सोलो चित्रपट मैंने प्याेर किया चित्रपटाच्या दरम्यानचा आहे. मैंने प्यातर किया सुरज बड़जात्याोचा पहिल्या चित्रपट आहे. १९८९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे सलमान रातो रात स्टार बनला होता. भाग्यश्रीच्या क्यूिटनेसने सुद्धा दर्शकांची मने जिंकली होती. सलमान आणि भाग्यश्रीचा पहिलाच चित्रपट होता ज्यामध्ये ट्रॅक साउंड होता. जसे आज डॉल्बीी साउंड चर्चा असते, तसेच तेव्हा फोर ट्रॅक साउंड मोठी गोष्ट होती.या चित्रपटामधील सर्व गाणी हिट झाली होती, खासकरून कबूतर जा जा या गाण्याने तर लोकांना वेड लावले होते. हा किस्सा याच गाण्याच्या शुटींगचा आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार या गाण्यामध्ये सलमानची इच्छा नसूनदेखील आपले वडील (राजीव वर्मा) यांच्या सोबत कामासाठी दुसऱ्या शहरामध्ये जातो. घरी सुमन (भाग्यश्री) एकटीच असते आणि प्रेम (सलमान खान) चे मन तिकडे पार्टीमध्ये लागत नाही. गाण्याचे सूर होते – कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा राम लक्ष्मकणच्या या कंपोजिशनवर एसपी बाला सुब्रह्मण्योम आणि लता मंगेशकरचा यांचा आवाज आहे.पडद्यावर पांढरे कबुतर सुमनचा संदेश घेऊन पोहोचते. सलमानचे डोळे भरून आले आहेत, तो काळे एविटर काढून लावतो जेणेकरून इतरांपासून अश्रू लपवले जावेत. ओठांवर बोल आहेत – यहां का मौसम बड़ा हसीन है, फिर भी प्यार उदास है, उनसे कहना दूर सही मैं, दिल तो उन्हीं के पास है. पण याचदरम्यान दिग्दर्शक यांचा आवाज येतो – कट! कट! सेटवरचे सर्व लोक चकित होतात कि असे काय झाले असावे. सर्व काही व्यवस्थित चालू होते.
दिग्दर्शक सूरज बड़जात्या् हे थांबवण्याचे कारण स्पष्ट करतात. गाण्याच्या शुटींग दरम्यान सलमानने ग्रे कलरचा सूट परिधान केला होता. सलमान त्यावेळी खूपच सडपातळ होता. खासकरून त्याच्या मांड्या खूपच बारीक होत्या. सेटवर जोरदार वारा सुरु होता, ज्यामुळे सैल पँट हवेत फडकत होती. असे म्हंटले जाते कि तेव्हा सेटवर कोणीतरी चेष्टेमध्ये म्हंटले होते कि असे वाटत आहे कि, जसे कोणीतरी लाकडावर पँट घातली आहे.हीच गोष्ट लक्षात घेऊन याचा उपाय शोधला गेला आणि यादरम्यान कोणीतरी म्हंटले कि सलमान खानला पॅंटच्या आतमध्ये लेगींस घालायला हव्यात. असे म्हंटले जाते कि एकूण ६-७ लेगींस सलमानला घालाव्या लागल्या होत्या, तेव्हा कुठे त्याच्या मांड्या भरीव दिसल्या होत्या त्यानंतर गाणे शूट झाले. हे गाणे खूपच सुपरहिट झाले होते आणि आजसुद्धा लोकांना ते खूप आवडते.