बॉलीवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान आपल्या वाढदिवशी (२७ डिसेंबर) पुन्हा एका मामा झाला आहे. सलमानची बहिण अर्पिता खान शर्माने भावाच्या वाढदिवशी एका मुलीला जन्म दिला होता. अर्पिताची अशी इच्छा होती कि आपल्या मुलाला भाऊ सलमान खानच्या वाढदिवशी जन्म द्यावा आणि झालेहि तसेच. अर्पिता आणि आयुषने आपल्या मुलीचे नाव आयत असे ठेवले आहे.
आयतच्या जन्मानंतर तिचे काही फोटो देखील तिचे पिता आयुषने फॅन्ससोबत शेयर केले होते. आता मुलीच्या जन्माच्या एक महिन्यानंतर आयुषने मुलीचा आणखीन एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मिडीयावर खूपच पसंत केला जात आहे. फोटो शेयर करताच तो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये आयुषने लिहिले आहे कि, हॅपी फेसेस.या फोटोमध्ये आयुषची पत्नी अर्पिता खान शर्मा, मुलगा आहिल आणि मुलगी आयत तिघे एकत्र पाहायला मिळत आहेत. फोटोमध्ये अर्पिताने दोन्ही मुलांना आपल्या हातामध्ये घेतले आहे. दोन्ही मुले आईच्या गालावर किस करत आहेत. तर फोटोमध्ये अर्पिता देखील खूपच खुश पाहायला मिळत आहे. तिला पाहून हे स्पष्ट होते कि ती आपल्या मातृत्वाचा खूप आनंद घेत आहे.
याचबरोबर अर्पिता आणि सलमान खानचे जिजा अतुल अग्निहोत्रीने सुद्धा हा फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन शेयर केला आहे. याशिवाय अतुलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ स्टोरीसुद्धा शेयर केली आहे. ज्यामध्ये या फोटोशूटच्या दरम्यानचे अनेक फोटो एकत्र पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओमध्ये अर्पिता आणि दोन्ही मुलांची केमिस्ट्रीसुद्धा मन जिंकणारी आहे. अर्पिताचे हे फोटो सोशल मिडीयावर युजर्सनी खूप पसंत केले आहेत.
अर्पिता खान शर्माला आपला भाऊ सलमानला त्यांच्या जन्मदिनी एक गिफ्ट देण्याची इच्छा होती. त्यामुळे तिने सलमानच्या वाढदिवशी मुलीला जन्म दिला. अर्पिताच्या मुलीचा जन्म सी-सेक्शन डिलीवरी द्वारे झाला आहे. अर्पिता आणि आयुषने १८ नोवेंबर २०१४ मध्ये लग्न केले होते. आयुष आणि अर्पिताचा आधीच एक मुलगा आहिल शर्मासुद्धा आहे. अर्पिताने ३० मार्च २०१६ मध्ये मुलगा आहिलला जन्म दिला होता.