सलमान खान आणि विराट कोहली हे दोघेही भारतातील सुपर स्टार आहेत. सलमान खान मोठ्या पडद्यावर त्याच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली विराट कोहली त्याच्या दमदार फलंदाजीने मैदानावरील प्रेक्षकांची मने जिंकतो. कोळी आणि सलमान खान दोघेही भरपूर कमाई करतात. विराट कोहलीची बीसीसीआय, आयपीएल व विविध जाहिरातींमधून कोरडी रुपयांची कमाई होते. सलमान खान त्याच्या एका चित्रपटांमधून करोडो रुपयांची कमाई करतो. सलमान खान कोणत्याही जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी देखील करोड रुपये फी घेतो. आज या लेखाद्वारे सलमान खान व विराट कोहली यांच्यात नक्की कोणाकडे संपत्ती जास्त आहे याचा खुलासा करणार आहोत.
विराट कोहलीचे संपत्ती
रन मशीन म्हणून ओळख असणा-या टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचे नाव जगभरातील श्रीमंत क्रिकेटर च्या यादीत समाविष्ट आहे. एका रिपोर्टनुसार सध्या विराट कोहली 390 कोटीहून अधिक संपत्तीचा मालक आहे. मुंबई व दिल्लीमध्ये विराटचे दोन अलिशान बंगले आहेत. सध्या विराट कोहली हेड अंड शोल्डर, पेप्सी, बुस्ट, फास्टट्रॅक आणि जिओनी यांसारख्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम करतो. या जाहिरातींमध्ये काम करून विराट करोड रुपये कामवतो.
सध्या विराट कोहली कडे अनेक महागड्या गाड्या आहेत ज्यांची किंमत जवळपास दहा करोड रुपये इतकी आहे. आतापर्यंत विराट कोहलीने १८ करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली आहे. बीसीसीआई कडून विराट कोहलीला 7 करोड़ इतका पगार मिळतो. तर रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु कडून विराट कोहलीला दरवर्षी 17 करोड़ मिळतात.
सलमान खानची संपत्ती
बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दबंग ३ च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. सलमान खान त्याच्या चित्रपटांमधून करोड रुपये कमावतो शिवाय चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाला होणाऱ्या नफ्यापैकी काही टक्के हिस्सा सुद्धा सलमान खानला दिला जातो. सलमान खान टीव्ही सिरीयलच्या सूत्रसंचालनासाठी सुद्धा करोडो रुपये फि आकारतो.
त्याचे नोएडा, चंडीगढ़, दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरात अनेक आलीशान आणि मोठी घरे आहेत. मुंबईतील बांद्रा येथे असलेल्या सलमान खानच्या घराची किंमत तब्बल ११४ करोड रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते. त्याची एकूण संपत्ति 1800 करोड़ हुन अधिक आहे असे सांगितले जाते.