२७ डिसेंबरला बॉलिवूडचा दबंग खान चा म्हणजे सलमान खानचा वाढदिवस असतो. यावर्षीचा त्याचा वाढदिवस त्याने मध्यरात्री मीडिया व दबंग ३ च्या कास्ट सोबत केक कापून सेलिब्रेट केला. सलमान खानने बॉलिवुडमध्ये कित्येक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मधल्या काही काळापासून त्याचा चित्रपटांमधील शर्टलेस वाला लुक एक स्टाइल मानली जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हा ट्रेण्ड कधी व कसा सुरू झाला?
सलमानची शर्टलेस सीन देण्याची सुरुवात २१ वर्षांपूर्वीपासून सुरू झाली. सर्वात आधी प्यार किया तो डरना क्या या चित्रपटांमध्ये सलमानने शर्टलेस सीन दिला होता. त्याच्या त्या लूकवर प्रेक्षकांची चांगलीच भुरळ पडली होती. त्याचप्रमाणे या चित्रपटातील ओ ओ जाने जाना हे गाणेदेखील सुपरहिट झाले होते. या गाण्यास एकवीस वर्ष उलटून गेले तरी देखील अजूनही हे गाणं सलमान खानच्या फॅन्सच्या तोंडात गुणगुणताना ऐकू येते. त्यावेळी या गाण्यात सलमान खान शर्टलेस दिसला होता पण त्यामागचे खरे कारण हे स्क्रिप्ट ची गरज किंवा सलमान खानची मागणी नव्हती. तर त्या वेळी एक अचानक समस्या उद्भवलेली त्यामुळे त्याला त्या गाण्यात शर्टलेस व्हावे लागले होते. एका मुलाखतीदरम्यान सलमान खानने सांगितले होते की त्या गाण्यात मला शर्ट घालूनच परफॉर्म करायचा होता परंतु मला जो शॉट दिला होता तो मला फिट बसत नव्हता. त्यामुळे त्या चित्रपटाचे डायरेक्टर सोहेल खानने सांगितले की तू असाच शर्टलेस स्टेजवर जा. सोहेल खान सलमान खानचा सख्खा भाऊच असल्यामुळे त्याने त्याचे बोलणे ऐकले आणि तो शर्ट न घालताच परफॉर्म करण्यासाठी तयार झाला. यासोबतच सलमानने मुलाखातीत ओ ओ जाने जाना या गाण्याबाबत सुद्धा एक किस्सा सांगितला.
खरेतर हे गाणे जब प्यार किसी से होता है या चित्रपटासाठी लिहिले गेले होते. परंतु त्या वेळी या चित्रपटाच्या मेकर्सनी हे गाणे रिजेक्ट केले. परंतु सलमान खान ला हे गाणे पर्सनली खूप आवडले होते त्यामुळे त्याने हे गाणे स्वतःहून प्रोडक्शन चित्रपटासाठी वापरायचे ठरवले.
सलमान खानचा दबंग ३ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने १०० कोटी क्लब मध्ये एन्ट्री घेतली आहे. या चित्रपटात सलमान सोबत सोनाक्षी सिन्हा व महेश मांजरेकर ची मुलगी सई मांजरेकर आहेत. प्रभूदेवाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.