सुपरस्टार सलमान खान च्या ५४ व्या वाढदिवशी सलमान ची बहीण अर्पिता आणि तिचा पती आयुष्य शर्मा च्या घरी मुलीचा जन्म झाला. ह्यामुळे सलमान खान आणि कुटुंबीय खूप आनंदात आहेत. अर्पिता आणि आयुष चं हे दुसरं मूल असून सलमान दुसऱ्यांदा मामा बनला आहे. पण सलमान च्या वाढदिवशीच अर्पिताची प्रसूती झाली. असे असले तरी प्रसूतीच्या आदल्या दिवशी १२ वाजता सलमान च्या बर्थडे पार्टीत धमाल करताना दिसली तेव्हाच ह्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु अर्पिता च्या परिजनांनी सांगितले कि ही नैसर्गिक डिलिवरी नव्हती तर सी-सेक्शन डिलिवरी होती.

सध्या सी-सेक्शन डिलिवरी चा ट्रेंड खूप जोरात चालू आहे. लोकं तारीख आणि वेळ ठरवून सी-सेक्शन डिलिवरी चा मार्ग अवलंबतात आणि मूल जन्माला घालतात. ह्यामुळे आपल्याला हवी ती तारीख आणि वेळ ठरवता येतेच पण नैसर्गिक प्रसूतीमुळे होणाऱ्या वेदनांपासूनही सुटका होते. हा एक ट्रेंड आहे कारण सी-सेक्शन फक्त आपातकालीन परिस्थितीतच केले जायचे. जेव्हा बाळाच्या किंवा आईच्या जीवाला धोका असेल तेव्हाच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे सिझेरियन केले जायचे. पण आजकाल गरज नसताना सुद्धा ग्रह ताऱ्यांचा मुहूर्त बघून हे केले जात आहे आणि काही रिसर्च मध्ये ह्याचे घातक परिणाम सांगितले गेले आहेत.
काय असते सी-सेक्शन डिलिवरी ?
आईला नैसर्गिक रित्या बाळाला जन्म देणे काही वैद्यकीय कारणामुळे शक्य नसल्यास वापरात येणारी दुसरी पद्धत म्हणजे सिझेरियन. सिझेरियन(सी-सेक्शन) करताना आई बाळाला योनीतुन जन्म न देता सर्जरी च्या मार्गाने बाळाला जन्म देते. ही प्रक्रिया आई आणि बाळाच्या स्वास्थ्यासाठी नैसर्गिक प्रक्रिये पेक्षा चांगली समजली जाते. ह्याचे कारण म्हणजे योनीतुन जन्म घेताना बाळाला आणि आईला असणारा जीवाचा धोका. पण सर्वांसाठीच ही प्रक्रिया चांगली ठरते? त्याचे उत्तर नाही असे आहे.
डॉक्टर काही मेडिकल कंडिशन्स मधेच सिजरींग करण्याचा सल्ला देतात जसे कि आईला उच्च रक्तदाबाचा विकार असल्यास किंवा डायबिटीज असल्यास. जुळे जन्माला येणार असल्यास, आईला कसले इन्फेक्शन्स असल्यास जे बाळाला ही नंतर होण्याचा धोका असतो. बाळाचा आकार मोठा असल्यास किंवा डिलिव्हरी च्या वेळीस डोके खालच्या बाजूला नसल्यास डॉक्टर सिजरींग चा उपाय सुचवू शकतात. कारण तसे न केल्यास आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका पोचू शकतो.
डिस्परेयूनिया होण्याचा धोका –
डिस्परेयूनिया म्हणजे संभोग करताना किंवा केल्यानंतर योनीमध्ये अत्यंत वेदना होणे. ह्यामुळे जोडीदाराच्या सेक्स लाईफ वर खूप वाईट प्रभाव पडतो. मेलबर्न मध्ये केल्या गेलेल्या अभ्यासात समोर आले आहे कि सिझेरियन झालेल्या महिलेला ६ ते १८ महिन्यांपर्यंत डिस्परेयूनिया सारख्या भयंकर वेदना देणाऱ्या समस्येला सामोरे जायला लागू शकते. मेलबर्न मध्ये १२४४ महिलांवर अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला. ही अभ्यासपत्रिका बीजेओजी, एन इंटरनेशनल जर्नल ऑफ ऑब्सट्रेटिक्स एंड गायनेकोलॉजी में प्रकाशित झाली आहे.
अर्पिता खान शर्मा ने सुद्धा आपल्या डिलिवरी साठी हाच पर्याय अवलंबला. तिला आपल्या भावाला म्हणजे सलमान ला त्याच्या वाढदिवशी एक चांगले गिफ्ट द्यायचे होते. त्यामुळे डॉक्टरांशी सल्लामसलत करून तिने ही तारीख निश्चित केली आणि सलमान च्या वाढदिवशी त्याला दुसऱ्यांदा मामा बनवलं. अर्पिता आणि आयुष ह्यांना ३ वर्षाचा मुलगा आहिल पण आहे. अर्पिता च्या कुटुंबाकडून हे सांगण्यात आले कि “आम्हाला हे कळवण्यास खूप आनंद होतो आहे कि आमच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. ह्या आनंदाच्या क्षणी आम्ही आमचे कुटुंब, मित्र आणि सर्व हितचिंतकांना त्यांनी दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद करू इच्छितो.”
अर्पिता सलमान ची बहीण आहे. अर्पितासाठी त्याने अत्यंत प्रतिष्टीत अश्या डॉक्टरांची फौज अर्पिताच्या डिलिवरी साठी पुरवली असेल ह्यात काही शंका नाही आणि अर्पिता ही सलमान साठी काहीही करायला नेहमीच तयार असते. सिझेरियन च्या दुष्परिणामांवर दुर्लक्ष करून सलमान च्या प्रेमाखातर हा निर्णय अर्पितासाठी क्षुल्लक ही वाटला असेल.
लेख आवडला असल्यास लाईक करून शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.