या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान ट्रेनसमोर आला होता सलमान, थोडक्यात वाचला होता जीव !

2 Min Read

सलमान खान बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. आजच्या काळामध्ये त्याचा प्रत्येक चित्रपट १०० करोडपेक्षा जास्त व्यवसाय करतो. आणि त्याचे कारण आहे सलमानची फॅन फॉलोईंग. सलमानने आपल्या करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये अनेक कॉमेडी, अॅ क्शन तर लव्ह स्टोरी चित्रपट आहेत. सलमानच्या लव्ह स्टोरींच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तेरे नाम या चित्रपटाचा उल्लेख होतोच.

सलमान खानचा तेरे नाम चित्रपट जबरदस्त हिट राहिला होता. या चित्रपटातील गाणी सुद्धा खूपच लोकप्रिय झाली होती. इतकेच नव्हे तर सलमानने या चित्रपटामध्ये जी हेअर स्टाईल ठेवली होती ती हेअर स्टाईलसुद्धा एक ट्रेंड बनली होती. प्रत्येकजण सलमानच्या या हेअर स्टाईलची कॉपी करण्याचा प्रयत्न करत होता आणि विशेष म्हणजे या हेअर स्टाईलचे नाव देखील तेरे नाम पडले होते. पण खूपच कमी लोकांना माहिती आहे कि या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान सलमान खान थोडक्यात बचावला होता.क्रू मेंबर्सने वाचवला होता जीव :- तेरे नाम चित्रपटामध्ये सलमानने एक अहंकारी आणि दबंग मुलगा राधेची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये सलमानच्या भूमिकेला भूमिका चावलाची भूमिका निर्जरावर प्रेम जडते. याचदरम्यान राधेचा शत्रू राधेला मारण्याची योजना बनवतो. या सीनमध्ये राधेच्या डोक्याला खोलवर दुखापत होते ज्यामुळे त्याची स्मृती जाते. या सीनच्या शुटींग दरम्यान सलमानला ट्रॅकवर चालायचे होते. या सीनच्या शूटवेळी सलमान आपल्या भूमिकेमध्ये इतका हरवला कि त्याला हेसुद्धा कळाले नाही कि ट्रेन त्यांच्या जवळ येत आहे. तेव्हा अचानक एका क्रू मेंबर्सने सलमानला धक्का देऊन सलमानचा जीव वाचवला होता.एक सीन करायची इच्छा नव्हती :- या चित्रपटाच्या एका सीनमध्ये सलमानची भूमिका अभिनेत्रीचे अपहरण करते, कारण ती सलमानच्या भूमिकेला प्रेम करण्यास नकार देते आणि त्याच्यासोबत गैरवर्तन करते. सलमान या सीनच्या विरुद्ध होता आणि त्याला हा सीन करायचा नव्हता. त्याचे म्हणणे होते कि यामुळे युवा वर्गाला चुकीचा संदेश जाऊ शकतो. पण नंतर दिग्दर्शक सतीश कौशिकने सलमानला समजावले.सलमान आपल्या कोणत्याही चित्रपटामध्ये किसिंग सीन किंवा इंटिमेट सीनच्या विरुद्ध आहे. सलमान आपल्या चित्रपटांची निवड अत्यंत लक्षपूर्वक करतो, यामुळे त्याच्या कोणत्याही चित्रपटामध्ये असे सीन नसतात. सलमानचे म्हणणे आहे कि त्याचे चित्रपट हे संपूर्ण कुटुंबसोबत पाहण्यासारखे असतात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *