सलमान खानची सावत्र आई हेलन तिच्या काळातील एक खूप यशस्वी अभिनेत्री राहिली आहे. हेलनचे पूर्ण नाव हेलन रिचर्ड्सन असे आहे. हेलनचे वडील म्यानमारच्या सेनेमध्ये होते आणि युद्ध्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला, ज्यानंतर हेलनची आई भारतामध्ये आली. त्यावेळी त्यांचे कुटुंब खूपच गरीब होते, ज्यामुळे हेलनने डांस करणे सुरु केले.

हेलनच्या सौंदर्याचे लाखो दिवाने होते. परंतु त्यांना चित्रपट निर्माते पीएन अरोड़ा यांच्यावर प्रेम जडले. रेल का डिब्बामध्ये हेलनने डांस केला होता आणि यादरम्यानच चित्रपट निर्माते पीएन अरोड़ा हेलनवर फिदा झाले. हेलनने चित्रपट निर्माते पीएन अरोडासोबत लग्न केले. दोघांचे विवाहित आयुष्य खूपच चांगले राहिले. परंतु काही काळानंतर दोघांच्यामध्ये वाद निर्माण झाले.बातमीनुसार दोघांच्या वादाचे कारण हे होते कि लग्नाच्या इतक्या वर्षानंतरहि हेलनला मुल झाले नाही. हेलन ६० च्या दशकापर्यंत खूपच लोकप्रिय झाली होती आणि त्यांच्या चित्रपटाचे बुकिंग अमाउंट, कॅश आणि चेक पेमेंट पीएन अरोराने आपल्या ताब्यात घेतले होते. हेलनची सर्व कमाई तिचा पती पीएन अरोरा आपल्या जवळ ठेवत होता ज्यामुळे दोघांमध्ये वाढ होऊ लागले.

नेहमीच वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापत असतात कि त्यांच्या पतीने त्यांना खूप मारहाण केली होती. हेलन भारतीय वंशाची नव्हती आणि येथील रिती-रिवाजांबद्दल तिला काही माहिती नव्हते. यामुळे ती खूपच एकटी होती. हेलनचे मित्रही खूप कमी होते. हेलनचा बँक बॅलन्स तिच्या पतीने हडप केला त्यामुळे तिने दिलीप कुमार यांच्याकडे मदत मागितली कि किमान त्यांचे पैसेतर बँकेत जमा करावेत.हेलनच्या पतीने आपल्या पावरचा वापर करून त्यांच्याकडून चित्रपटदेखील काढून घ्यायला सुरवात केली ज्यामुळे हेलनला सी ग्रेड चित्रपटांमध्ये देखील काम करावे लागले. १९७३ मध्ये हेलनने घटस्फोट घेतला. यानंतर शोलेच्या आईकॉनिक नंबरच्या शुटींग दरम्यान त्यांची सलीम खानच्या सोबत जवळीक वाढली. सलीम खानने त्यावेळी हेलनला सपोर्ट केले.सलीम खान आणि हेलन यांचे अफेयर ८ वर्षे सुरु होते. सलीम खान यांचे पहिले लग्न सुशीला चरक (सलमा खान) सोबत झाले होते आणि त्यांची ४ मुले होती. परंतु तरीही सलीम खानने हेलनसोबत लग्न केले. सुरवातीला मुलांनी हे मान्य केले नाही. पण हळू हळू त्यांनी हेलनला स्वीकारले.