बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी कठोर परिश्रम घेऊन आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. ज्यामुळे त्यांचा प्रत्येक चित्रपट करोडोंची कमाई करतो. या स्टार्समध्ये अक्षय कुमारचे देखील नाव घेतले जाते. आज अक्षय कुमार फिल्म जगतातील सुपरस्टार अभिनेता आहे. अक्षय कुमार सलग हिट चित्रपट देणारा अभिनेता बनला आहे.

अक्षय कुमारने आपले करियर मार्शल आर्ट मधून सुरु केले होते. अक्षयने आज आपल्या कठोर परिश्रमाने बॉलीवूडमध्ये आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. बॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्री आज त्याच्यासोबत काम करण्यासाठी उत्स्तुक आहे. परंतु आज आम्ही साउथच्या एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी अक्षय कुमारसाठी वेडी आहे.आम्ही इथे ज्या अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत तिचे नाव आहे समांथा रुथ प्रभु. समांथा रुथ प्रभु साउथ फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक साउथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. साउथचा प्रसिद्ध अभिनेता नागार्जुनची ती सून आहे. समांथा रुथ प्रभुने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि ती बॉलीवूड स्टार अक्षय कुमारला ती खूप पसंत करते आणि ती त्याची खूप मोठी फॅन आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्याची तिची खूप इच्छा आहे.अक्षय कुमारच्या प्रसिद्धीचा अंदाज याच गोष्टीवरून लागला जाऊ शकतो. एक प्रसिद्ध अभिनेत्री त्याची इतकी मोठी फॅन आहे तर साधारण लोक त्याचे किती फॅन असतील. अक्षय कुमार नुकतेच गुड न्यूज या चित्रपटामध्ये पाहायला मिळाला होता. लवकरच तो रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या चित्रपटामध्ये पोलिसाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये बऱ्याच वर्षानंतर कैटरीना कैफ अक्षय कुमार सोबत दिसणार आहे.