पैशांसाठी पार्ट टाईम जॉब करायची समांथा, आता एका चित्रपटामधून कमावते करोडो रुपये !

2 Min Read

साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली समांथा अक्किनेनीने नुकतेच आपला वाढदिवस साजरा केला आहे. समांथाने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज केले. समांथा अक्किनेनी आता ३३ वर्षांची झाली आहे. समांथाचा जन्म २८ एप्रिल १९८७ रोजी चेन्नई येथे झाला होता आणि समांथाचे लग्न २०१७ मध्ये नागार्जुनचा मुलगा नाग चैतन्यसोबत झाले होते.एका चित्रपटाच्या शुटींगदरम्यान हे दोघे एकत्र आले होते आणि त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले. बराच काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनाही वाटले कि आता आपल्याला लग्न करायला हवे आणि त्यानंतर दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे समांथाच्या सासरचे सर्व सदस्य हे साउथ फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. समांथा सासरे हे साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता आहेत तर तिचा दीर अखिल अक्किनेनी हासुद्धा प्रसिद्ध अभिनेता आहे.
समांथा सुन म्हणून मिळाल्याने नागार्जुन खूपच खुश आहे. समांथाने २०१० मध्ये ये माया चेसवे या चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. समांथाची एकूण संपत्ती ३५६ करोड रुपये इतकी आहे आणि विशेष म्हणजे समांथा छोटी मोठी कामे करत असे आणि त्याच पैशावर आपले घर चालवत असे.वास्तविक लहानपणापासूनच समांथाला अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. लहानपणापासूनच ती ग्लॅमरच्या दुनियेमध्ये फेमस होती परंतु तिच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. तेव्हा समांथाने मॉडलिंगच्या क्षेत्रामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर ती घर खर्च चालवण्यासाठी पार्ट टाईम जॉब देखील करायची. जेव्हा समांथा मॉडलिंगच्या दुनियेमध्ये होती तेव्हा तिला एका चित्रपटाची ऑफर मिळाली आणि विशेष म्हणजे तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. समांथाचे मुर्सल आणि रंगस्थलम हे दोन चित्रपट खूपच सुपरहिट झाले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटांमधील समांथाचा अभिनय दर्शकांना खूपच आवडला होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *