समीरा रेड्डीचा एक जुना व्हिडीओ सध्या खूपच चर्चेमध्ये आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री पाण्यामध्ये वेगवेगळ्या बिकिनीमध्ये फोटोशूट करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ २०१९ चा आहे जेव्हा अभिनेत्री प्रेग्नंट होती. तिने तेव्हा व्हिडीओ शेयर करून लोकांना आपल्या शरीरावर प्रेम करण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला होता.

आलिया भट्ट, सोनम कपूर आणि बिपाशा बसू सारख्या बॉलीवूड अभिनेत्रींनी प्रेग्नंसी दरम्यान फोटोशूट केले आहे. लिजा हेडनने प्रेग्नंसीदरम्यान बोल्ड फोटोशूट केले होते आणि खूपच चर्चेत राहिली होती. पण समीरा रेड्डी जेव्हा २०१९ मध्ये प्रेग्नंट होती तेव्हा तिने आपल्या फोटोशूटने सर्वांनाच हैराण केले होते.

समीरा रेड्डीने सांगितले कि तिला डिलिव्हरीनंतर कोणत्या अडचणीमधून जावे लागले होते. तिने सांगितले कि हार्मोंसमध्ये खूप बदल झाले होते आणि मूड स्विंग्सचा देखील सामना करावा लागला होता. अभिनेत्रीने हा देखील खुलासा केला होता कि तिला मुलाच्या जन्माच्या वेळी नैराश्याने ग्रासले होते ज्यामुळे तिला आई होण्याचा आनंद अनुभवता आला नाही.

समीरा रेड्डीने शेवटी आयुष्य बिनधास्तपणे जगण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट झाली तेव्हा तिने या खास मुमेंटमधील प्रत्येक क्षणाचा खूपच आनंद लुटला. ज्याची साक्ष तिने २०१९ मध्ये शूट केलेल्या व्हिडीओने दिली. अभिनेत्रीला पाण्याखाली वेगवेगळ्या बिकिनीमध्ये फोटो काढताना पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sameera Reddy (@reddysameera)