बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूरने नायक ते खलनायक पर्यंत अनेक उत्कृष्ठ भूमिका साकारून दर्शकांच्या मनावर राज्य गाजवले आहे. शक्ती कपूर आज देखील बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह आहे. शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरदेखील बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अल्पावधीतच तिने बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त श्रद्धा कपूर तिच्या रिलेशनशीपमुळे देखील नेहमी चर्चेमध्ये असते.श्रद्धा कपूरने करियरची सुरुवात आशिकी २ या चित्रपटामधून केली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत आदित्य रॉय कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ गल्ला जमविला होता आणि या चित्रपटामधून श्रद्धा रातोरात सुपरस्टार झाली होती. या चित्रपटानंतर तिने इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शिवाय श्रद्धा कपूरचे नाव अनेक लोकांसोबत देखील जोडले गेले. त्यामधील सर्वात पहिले नाव होते अभिनेता, दिग्दर्शक व गायक फरहान खानचे.
मिडियाच्या माहितीनुसार श्रद्धा कपूर आणि जावेद अख्तरचा मुलगा आणि बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर एकमेकांना डेट करत होते. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर श्रद्धा कपूरने या गोष्टीचा खुलासा स्वतः केला होता. हि देखील बातमी समोर आली होती कि शक्ती कपूर या रिलेशनवर नाराज होते. पण श्रद्धा वडिलांचे न ऐकता फरहानसोबत लिव इनमध्ये राहिली होती. पण काही कारणामुळे दोघे वेगळे झाले. सध्या श्रद्धा तिच्या घरी परतली असून लवकरच तिच्या आयुष्यामध्ये एका नवीन व्यक्तीची एंट्री होणार आहे.श्रद्धा सध्या ज्या मुलाला डेट करत आहे तो कोणताही बॉलीवूड अभिनेता नाही तर एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. त्याचे नाव रोहन सेठ असे आहे. श्रद्धा आणि रोहन यांचे खूप जवळचे संबंध असून ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. रोहनचे वडील देखील बॉलीवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. वडिलांसारखेच रोहनने देखील फोटोग्राफीमध्ये आपले करियर बनवले आहे. मिडियाच्या माहितीनुसार सध्या श्रद्धा कपूर रोहनला डेट करत आहे. विशेष म्हणजे शक्ती कपूरला देखील रोहन पसंत आहे आणि दोघांचे लग्न व्हावे अशी देखील त्यांची इच्छा आहे. पण श्रद्धाने देखील या बातमीची पुष्टी केलीली नाही.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.