बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि प्रोड्युसर संदीप सिंह खूपच चांगले मित्र आणि जवळचे होते. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खूपच इमोशनल पोस्ट लिहिली आहे. संदीपने अंकिता आणि सुशांतसोबतच्या काही आठवणी ताज्या केल्या आहेत आणि म्हंटले आहे कि अंकिता लोखंडेच त्याला वाचवू शकत होती. संदीप सुशांत सिंह राजपूतच्या अंतिम संस्कारात देखील सामील झाला होता. तर अंकिता सुशांतचे वडील के के सिंह यांना एक दिवस सुशांतच्या अपार्टमेंटमध्ये भेटायला आली होती.सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचे जवळचे मित्र संदीप सिंहने अंकिताला डेडिकेट करत एक लांबलचक नोट लिहिली आहे. संदीपने अंकिता आणि सुशांतचा एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो शेयर करताना संदीपने लिहिले आहे कि डियर अंकिता, प्रत्येक दिवसासोबत मला एक विचार वारंवार सतावत आहे. जर…जर आपण प्रयत्न केला असता. आपण त्याला रोखले असते आणि भीख मागितली असती. इतकेच नाही तर जेव्हा तुम्ही दोघे वेगळे झाला होता तेव्हा तुम्ही फक्त त्याच्या आनंदासाठी आणि यशासाठी प्रार्थना केली. तुमचे प्रेम खरे होते. तुम्ही अजून देखील आपल्या घराच्या नेमप्लेट वरील त्याचे नाव हटवले नाही. अंकिता आजही सुशांतची हि आठवण जपत आहे. अंकिता ज्या घरात राहते त्या घराच्याबाहेर आजही सुशांतच्या नावाची पाटी लागलेली आहे. त्यामुळे तिच्या मनात सुशांतविषयी किती आदर आहे, हे यातून स्पष्ट होते. त्यामुळे अंकिता अजूनही सुशांतला विसरलेली नाही, हेच यातून दिसते, असेही संदीप सिंह म्हणाला.
संदीपने लिहिले आहे कि, मला त्या दिवसांची आठवण येते जेव्हा आपण तिघे एक कुटुंबाच्या रुपामध्ये लोखंडवाला येथे एकत्र राहत होतो. एकत्र जेवण बनवणे, खाणे, गोव्यासाठी लांब ड्राइव, आपली होळी, संदीपने पुढे लिहिले आहे कि आज देखील माझे मानणे आहे कि तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनला होता. पण मी त्याला परत कसे आणू. मला तो परत हवा आहे. मला आपण तिघे पुन्हा परत हवे आहे.
संदीपने शेवटी लिहिले आहे, मला माहिती आहे कि फक्त तू (अंकिता)च त्याला वाचवू शकत होतीस. जर, तुमच्या दोघांचे लग्न झाले असते जसे आपण स्वप्न पाहिले होते. तू त्याला वाचवू शकत होतीस जर तो फक्त तुला तिथे राहायला दिला असता. तू त्याची प्रेमिका, त्याची पत्नी, त्याची आई, नेहमीच त्याची सर्वात चांगली मित्र होतीस. मी तुझ्यावर प्रेम करतो अंकिता. मला आशा आहे कि मी तुझ्यासारखा मित्र कधीही गमावू शकत नाही.