बॉलीवूड अभिनेत्री संजना सांघी दिल्ली येथील राहणारी आहे, पण दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत अभिनित आगामी दिल बेचारा चित्रपटामध्ये ती एक बंगाली मुलीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमध्ये फिट बसण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली होती. संजनाने यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून प्रशिक्षण घेतले, तिने काही वर्कशॉपदेखील जॉईन केले आणि तिने असे दररोज काही महिने जवळ जवळ सात तास काम केले. बंगालीच्या सामान्य भाषेवर देखील तिने आपली पकड बनवली.याशिवाय तिने चित्रपट दिग्दर्शक मुकेश छाबडासोबत अभिनयाच्या कही वर्कशॉपमध्ये देखील सहभाग घेतला आणि एनएसडीची पदवीधर व अभिनेत्री सुष्मिता सूरसोबत देखील तिने भाषेचे प्रशिक्षण घेतले. संजनाने म्हंटले कि शेवटी सहा ते सात महिन्यांपर्यंत प्रत्येक दिवशी मेहनत केल्यानंतर मी या भाषेमध्ये सहज बोलायला शिकले आणि (सह-कलाकार) स्वस्तिका (मुखर्जी) आणि शाश्वत दा (चटर्जी) सोबत बंगालीमध्ये सीन आरामशीर चित्रित करू लागले, जे चित्रपटामध्ये माझ्या आईवडिलांची भूमिका साकारत आहेत.
तिने पुढे म्हंटले कि स्वस्तिका आणि शाश्वत दा स्वतः देखील बंगाली चित्रपटांमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांना माहित नव्हते कि मी उत्तर भारतामधून आहे आणि मला आठवते कि जेव्हा स्वस्तिका, मुकेशला सांगत होते कि किजीच्या भूमिकेसाठी तू बंगाली मुलीची निवड करून चांगले केलेस, नाहीतर खूपच अवघड झाले असते, संजना म्हणाली कि त्यावेळी हि माझी सर्वात मोठी प्रशंसा होती.
दिल बेचारा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तसे तर सुशांतचे चाहते सोशल मिडियावर या गोष्टीचा आग्रह धरत आहेत कि दिल बेचारा चित्रपट थियेटरमध्ये प्रदर्शित करण्यात यावा, पण कोरोना काळामध्ये निर्मात्यांना हे संभाव नाही वाटले आणि त्यांनी या चित्रपटाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच मुकेश छाबरा द्वारे दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरसोबत दोन गाणी देखील प्रदर्शित करण्यात आली आहेत, जे लोकांना खूपच पसंत येत आहेत.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.