अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये प्रकरणात त्याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारामधील त्याची हिरोईन संजना सांघीची पोलिसांनी तब्बल नऊ तास चौकशी केली. या दरम्यान तिने केलेल्या सुशांतवरील #MeToo आरोपांपासून ते त्याच्या डिप्रेशनबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या ऑडिशन नंतर मुकेश छाबडा यांनी चित्रपटासाठी तिची निवड केल्याचे यादरम्यान तिने सांगितले. दिल बेचारा चित्रपटाचे दिग्दर्शन देखील मुकेश छाबडा यांनीच केले आहे. चित्रपटाच्या शुटींग दरम्यान सेटवरच सुशांत आणि संजना यांची ओळख झाली होती.चौकशीदरम्यान तिने #MeToo दरम्यान मी सुशांतवर कोणतेही आरोप केले नव्हते आणि अशी कोणतीही घटना घडली नव्हती असे देखील यावेळी स्पष्ट केले. २०१८ मध्ये ज्यावेळी #MeToo मोहिमे अंतर्गत अनेक अभिनेत्र्या आपल्यावर झालेल्या अन्यायाचा खुलासा करते होत्या त्यादरम्यान कोणीतरी माझ्याबद्दल अफवा पसरवली होती असे देखील तिने यावेळी सांगितले.
चित्रपटाचे बरेच शुटींग झाले होते आणि पुढच्या शुटींगसाठी अजून खूप कालावधी शिल्लक होता. त्यामुळे मी माझ्या आईसोबत अमेरिकेला गेले. माझ्या नावावर सोशल मिडियाच्या माध्यमातून सुशांतवर आरोप केले जात आहेत याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती. ज्यावेळी मी अमेरिकेहून परतले आणि हे सर्व प्रकरण मला समजले त्यावेळी सोशल मिडियाच्या माध्यमातून या सर्व अफवा असल्याच सांगितल होती. या घटनेनंतर सुशांत खूपच निराश झाला होता. #MeToo मोहिमेतून माझ्यावर कसे खोटे आरोप केले आहेत हे त्याने मला सांगितले होते, हेदेखील तिने स्पष्ट केले.
ज्यावेळी सुशांतवर खोटे आरोप झाले होते त्यावेळी त्याने संजनासोबतचं एक चॅट शेयर करून आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. याविषयी संजनाने पुढे सांगितले कि त्यावेळी काही कारणामुळे सुशांत आणि माझा संपर्क होऊ शकला नाही आणि तो या आरोपांमुळे खूपच त्रस्त होता. हे आरोप खोटे असल्याचे सांगण्यासाठी त्याला आमच्या चॅटचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेयर करावा लागला आणि मला त्यामध्ये काहीच अयोग्य वाटले नाही.
शुटींग सुरु असताना तो कधीच तणावामध्ये किंवा डिप्रेशनमध्ये असल्याचे जाणवले नाही. त्याच्या खासगी जीवनासंबंधी तो कधीच बोलायला तयार होत नव्हता. तो फक्त आपल्या कुटुंबातील मजेदार किस्से सांगायचा. त्यामुळे त्याच्या डिप्रेशनबद्दल कधीच जाणीव झाली नाही, अशी देखील माहिती तिने यावेळी दिली.