बॉलीवूड फिल्मी जगतामधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तला आज कोणाच्याही ओळखीची गरज नाही, फिल्मी जगतामध्ये संजय दत्तने आपली एक खास ओळख बनवली आहे. अभिनेता संजय दत्त त्याच्या चित्रपटासोबतच त्यांच्या पर्सनल लाईफमुळे देखील खूपच चर्चेमध्ये राहत असतो, संजय दत्तने आपल्या आयुष्यामध्ये तीन लग्न केले आहेत ज्यामुळे तो नेहमीच चर्चेमध्ये राहत असतो.

मान्यता संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. दोघांनी ७ फेब्रुवारी २००८ मध्ये गोव्यामध्ये लग्न केले होते. याच्या जवळ जवळ दोन वर्षानंतर २१ ऑक्टोबर २०१० रोजी दोघेही दोन जुळ्या मुलांचे आईवडील बनले होते. संजय दत्तला एक मुलगा झाला होता त्याचे नाव शहरान ठेवले आणि मुलीचे नाव इकरा ठेवले. मान्यता नेहमी आपल्या कुटुंबाचे फोटो सोशल मिडियावर शेयर करत असते. अशामध्ये गेल्या सोमवारी तिने आपल्या मुलीसोबत एक खूपच सुंदर फोटो शेयर केला आहे.या फोटोमध्ये आई आणि मुलगी दोघींनीहि एकसारखाच ड्रेस परिधान केला आहे. स्वेटर आणि स्कर्टमध्ये दोघीही खूपच क्युट दिसत आहेत. हा फोटो विदेशामध्ये शॉपिंग करतानाचा आहे. फोटो पाहिल्यास असे वाटते कि आई आणि मुलगी आज चांगलीच शॉपिंग करणार आहेत. तसे तर फोटो शेयर करताना मान्यताने लिहिले आहे कि एकत्र रहा, एकत्र वाढा, आनंदी रहा.मान्यता आणि इकराचा हा फोटो फॅन्सला खूपच पसंत येत आहे. त्यांना आई आणि मुलगीची हि जोडी खूपच गोड दिसत आहे. एका युजरने लिहिले आहे कि इकरा तर हुबेहूब तिच्या आई सारखीच दिसू लागली आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि आई आणि मुलगी एकत्र शॉपिंगला जात आहेत हेच क्षण पुन्हा आठवणी बनून राहतात. या फोटोला आतापर्यंत हजारो लाइक्स आणि शेकडो कमेंट भेटले आहेत.मान्यताशिवाय संजय दत्तसुद्धा आपल्या मुलांच्या खूपच जवळ आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि जेव्हा तो मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत होता तेव्हा मुले त्याला पाहण्यासाठी खूपच आतुर होत असत. त्याची पत्नीसुद्धा सांगते कि ती मुलांना जेलमध्ये त्याला भेटण्यासाठी घेऊन जात असे पण संजय दत्त त्यांना भेटत नव्हता. त्याची इच्छा नव्हती कि मुलांनी त्याला त्या परिस्थितीमध्ये पाहावे. उलट त्याने मुलांना हे सांगितले होते कि तो चित्रपटाच्या शुटींगसाठी बाहेर गेला आहे.जेव्हा संजय दत्त मान्यतासोबत लग्न करणार होता तेव्हा अनेक लोक खुश नव्हते. खासकरून संजय दत्तच्या दोन्ही बहिणी नम्रता आणि प्रिया दत्त यांची इच्छा नव्हती कि मान्यता त्यांच्या घरची सून व्हावी. अशामध्ये मान्यता आणि संजयने दोघी बहिणींना समजविण्याचा खूप प्रयत्न केला पण नंतर त्यांनी कोणाचेहि न ऐकता लग्न केले. सध्या त्यांचे सर्वकाही सुरळीत चालू आहे.