खलनायक चित्रपटासाठी संजय दत्त नाही तर हा अभिनेता होता सुभाष घईची पहिली पसंत !

2 Min Read

सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरस कहर चालू आहे. ज्यामध्ये देशभरामध्ये १७ में पर्यंत लॉकडाउन केले गेले आहे. तर या काळामध्ये सर्वजण आपल्या घरामध्ये बंद आहेत, यादरम्यान चित्रपट निर्माते सुभाष घईसुद्धा घरामध्ये बसून आपल्या आगामी प्रोजेक्टवर काम करत आहेत. याचबरोबर ते दररोज आपल्या चित्रपट शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवत देखील आहेत.इतकेच नाही तर सुभाष घई आपल्या प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक खलनायकच्या सीक्वल वर काम करण्यात व्यस्त आहेत आणि कालीचरणचा रिमेक बनवण्याच्या तयारीमध्ये सुद्धा आहेत. सुभाष घईने दिग्दर्शक म्हणून कालीचरण या चित्रपटामधून आपल्या करियरची सुरवात केली होती.
खलनायकच्या सीक्वलवर करत आहेत काम :- सुभाष घईने आपल्या मुलाखतीमध्ये आगामी प्रोजेक्ट खलनायक सीक्वल आणि जुन्या खलनायक बद्दल बातचीत केली. सुभाष घई म्हणाले कि त्यांच्याजवळ दोन स्क्रिप्ट आहेत आणि गेल्या सात महिन्यांपासून ते कंटेट क्रिएट करण्याचे काम करत आहेत. कालीचरण सुभाष घई दिग्दर्शित पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय मुख्य भूमिकेमध्ये होते.तर खलनायकमध्ये जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित हे तीन दिग्गज कलाकार होते. खलनायक चित्रपटाबद्दल सुभाष घईने सांगितले कि खलनायक २ ची स्टोरी कशी असेल. सुभाष घईने सांगितले कि यावेळी स्टोरी तिथूनच सुरु होईल जिथून ती संपली होती. म्हणजेच यावेळी चाहत्यांना पाहायला मिळेल कि बल्लू हि भूमिका तुरुंगातून बाहेर येते.जॅकी श्रॉफला करायचे होते कास्ट :- सुभाष घईने सांगितले कि खलनायकमध्ये जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर यांना कास्ट करण्याची तयारी करण्यात आली होती, तथापि नंतर संजय दत्तसोबत चित्रपट तयार करण्यात आला. खलनायक चित्रपट संजय दत्तच्या करियरमधी सर्वात प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे आणि याच चित्रपटामुळे संजय दत्तला खलनायक म्हणून ओळखले जाते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *