सारा अली खान.. सध्या बॉलिवूडमध्ये गाजणारे एक नाव. तिच्या सौंदर्याने तर अनेकांना घायाळ केलंय. केवळ सौंदर्याच्या जोरावर नव्हे तर आपल्या अभिनयाच्या जोरावर साराने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र हल्ली प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चूकवणारी ही सारा एकेकाळी लठ्ठपणामुळे त्रस्त होती, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. होय, मात्र हे अगदी खरं आहे. सारा एकेकाळी तब्बल 96 किलोंची होती. मात्र या लठ्ठपणावर मात करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. आज तिच्या रुपाकडे पाहून तिच्या या मेहनतीचे चीज झाले असेच म्हणावे लागेल. साराच्या जेवणाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून हे रहस्य उलगडले आहे.

आपल्या लाडक्या बॉलिवूड स्टारला त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात फॉलो करत असतात. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची फॅशन त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे, हे जाणून घेण्यात चाहत्यांना खूपच इंटरेस्ट असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत परफेक्ट राहण्याकडे सर्वच स्टार्सचा कल असतो. बॉलिवूड स्टार्स त्यांच्या फिटनेसची खूप काळजी घेतात. सर्व स्टार्सची तंदुरुस्त राहण्याची स्वतःची पद्धत आहे. नुकताच अभिनेता वरुण धवन याने सारा अली खानचे फिटनेस गुपित शेअर केले. इंस्टाग्रामवर साराच्या जेवणाचे छायाचित्र पोस्ट करून या स्टारने हे रहस्य उघड केले आहे. त्यामुळे आहाराच्या बाबतीत सारा किती सजग आहे हेच पुन्हा एकदा समोर आले आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये फारच कमी अन्न आहे. एक भाजी, छोटा ब्रेड आणि काकडीचे तीन काप. या चित्राच्या कॅप्शनमध्ये वरुणने लंच असे लिहिले आहे. विशेष म्हणजे सारा तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. ती रोज जिममध्ये जाते. याआधी सुद्धा साराने तिच्या जीममधील वर्क आऊटचे फोटो शेअर केले होते, तिच्या या लुकला सुद्धा खूप पसंत करण्यात आले होते.
खरं तर, कॉलेजच्या काळात अभिनेत्रीकडे पीसीओडी होता, ज्यामुळे तिचं वजन मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. पण सारा इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकण्यासाठी सतत जिममध्ये जाऊ लागली, पिझ्झापासून सलादपर्यंत आली आणि आज ती अभिनेत्री म्हणजे युवकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एक युथ आयकॉन म्हणून तिच्याकडे पाहिले जावू लागले आहे.

आजकाल सारा आणि वरुण आपल्या आगामी ‘कुली नंबर 1’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट निर्माता डेव्हिड धवनचा जुना चित्रपट ‘कुली नंबर 1’ चा रीमेक आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. साराने केदारनाथ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता सुशांतसिंग राजपूतसोबत पदार्पण केले होते. तिच्या या सिनेमातील भूमिकेला सुद्धा लोकांनी खूप पसंत केले होते. तुम्ही सुद्धा सध्या लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर काळजी करू नका, जीममध्ये मेहनत करा, घाम गाळा, आहारात बदल करा. मग बघा साराप्रमाणे तुम्ही सुद्धा कसे वजनावर नियंत्रण मिळवता.