करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’ चा सीझन ७ सुरू झाला आहे. नुकतेच या सिझनमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर पाहायला मिळाल्या होत्या. सारा आणि जान्हवी एकमेकांच्या चांगल्या फ्रेंड आहेत. सारा आणि जान्हवी नेहमी एकत्रितपणे सुट्ट्या घालवताना पाहायला मिळत असतात. अशामध्ये जेव्हा दोघी या शोमध्ये एकत्र दिसल्या तेव्हा करण जोहरने त्यांच्यासोबत अनेक विषयावर बातचीत केली. यादरम्यान करणने सारा अली खानला तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल पर्सनल प्रश्न देखील विचारला, जो खूपच हैराण करणारा होता.

करण जोहर शोमध्ये आलेल्या पाहुण्यांसोबत रॅपिड फायर राउंड खेळत असतो. असाच एक गेम त्याने जान्हवी आणि सारासोबत देखील खेळला. यादरम्यान करणने साराला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबतच्या शारीरिक सं बं धांबद्दल प्रश्न विचारला. करणने विचारले कि तू एक्ससोबत कधी शारीरिक सं बं ध बनवला आहेस का नाही?

यावर साराने देखील मजेदार उत्तर दिले. ती म्हणाली कि बरोबर उत्तर आहे नाही आणि बरोबर उत्तर आहे कदाचित, अपवादात्मक परिस्थितीत, तुम्हाला माहिती नाही. साराचे हे उत्तर ऐकून तिचे उपस्थित असलेले जान्हवी कपूर आणि करण दोघेही हसू लागले.

तथापि साराचे हे उत्तर ऐकल्यानंतर चाहते देखील तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल अंदाज लावू लागले आहेत. ज्याचे नाव शोमध्ये सांगिलेले नाही. तथापि हा एपिसोड टेलीकास्ट होण्यापूर्वी करणने सांगितले होते कि सारा आणि कार्तिक आर्यन रिलेशनशिप आहेत.

या एपिसोडमध्ये साराने आपल्या फ्यूचर पतीबद्दल देखील मत व्यक्त केले. अभिनेत्री म्हणाली कि तिला रणवीर सिंहसोबत लग्न करायचे आहे. साराने हे देखील सांगितले कि याचा काहीच फरक पडत नाही कि तो विवाहित आहे. हि गोष्ट तिच्यासाठी मोठी नाही.