बॉलीवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान आपल्या चित्रपटांशिवाय आपल्या मधुर व्यवहारासाठी देखील नेहमी चर्चेमध्ये राहते. ती इतर अभिनेत्रींसारखी घमंडी नाही. सारा जिथे देखील जाते ती चर्चेचा विषय बनते. काही दिवसांपूर्वी तिचा एक लहानपणीचा किस्सा तिने शेयर केला होता. हा किस्सा साराची आई अमृता आणि पिता सैफ अली खान संबंधीत आहे.

हे तर सर्वांनाच माहिती आहे कि एके काळी सैफ आणि अमृता एकमेकांवर प्रेम करत होते. जेव्हा हे दोघे एकत्र होते तेव्हा खूप मजा मस्ती करत होते. एकदा सैफ अली खान आणि अमृता सिंहने कॉमन फ्रेंड नीलू मर्चंटसोबत प्रँक करण्याची योजना बनवली. हे दोघे नीलूला घाबरणार होते. यामुळे या कपलने आपल्या चेहऱ्याला बूट पॉलिश लावली आणि नीलू मर्चंटच्या खोलीमध्ये घुसले.

सारा अली खान पुढे म्हणाली कि योग्य संधी बघून अरबाजने नीलू मर्चंटचा दरवाजा उघडला आणि माझी आई अमृता देखील आतमध्ये गेली. त्यावेळी नीलू तिच्या पतीसोबत गाढ झोपेमध्ये होती. जेव्हा या दोघांना जाग आली तेव्हा ते खूप जोराने ओरडले. नीलूच्या नवऱ्याने तर माझ्या आईला मारलेच असते. त्याने बंदूक उचलली आणि माझ्या आईला शूट करणार होता. इतक्यात माझ्या आईने हात वर करून म्हणाली कि गोळी मारू नको मी डिंगी आहे.

सारा अली खानने जेव्हा हा किस्सा शेयर केला तेव्हा तिला हसू आवरत नव्हते. ती म्हणाली कि मला ते दृश्य आठवूनच खूप हसू येते कि बूट पॉलिश चेहऱ्यावर लावून माझे आईवडील कसे दिसत होते आणि तो काय सीन होता. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांना वेगळे होऊन खूप वर्षे झाली आहेत. १९९१ मध्ये दोघांनी लग्न केले होते. तर २००४ मध्ये दोघे घटस्फोट घेऊन वेगळे झाले. सैफ आणि अमृताला एक मुलगीशिवाय एक मुलगा देखील आहे ज्याचे नाव इब्राहिम अली खान आहे.