२०२० हे वर्ष बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीसाठी खूपच वाईट ठरले आहे. गेल्या महिन्यात सुशांत सिंह राजपूतच्या नि*ध*नामधून लोक सावरत नाहीत तोच काही दिवसांनंतर बॉलीवूडमधील दिग्गज कोरियोग्राफर सरोज खान यांचे नि*ध*न झाले. प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खानने ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांचे नि*ध*न हृदयविकारामुळे झाले आहे.कोरियोग्राफर सरोज खानने आपल्या नि*ध*नाच्या फक्त १८ दिवस अगोदर इंस्टाग्रामवर एक भावूक करणारी पोस्ट शेयर कली होती. या पोस्टमध्ये त्यांनी दिवंग अभिनेता सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली दिली होती. सरोज खान यांच्या नि*ध*नाने संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्री शोकाकुल अवस्थेमध्ये गेली आहे. २०२० मध्ये बॉलीवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे ज्यामध्ये आता सरोज खान यांचे देखील नाव जोडले गेले आहे. सरोज खान यांच्या नि*ध*नानंतर सर्वांचे लक्ष त्यांच्या शेवटच्या पोस्टने वेधून घेतले. ज्यामध्ये त्यांनी सुशांत सिंह राजपूतची आठवण काढली होती.
सरोज खानने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून सुशांतचा एक फोटो शेयर केला होता. या फोटोसोबत त्यांनी एक भावूक करणारा संदेश देखील लिहिला होता. सरोज यांनी या फोटोसोबत लिहिले होते कि मी सुशांत सिंह राजपूतसोबत कधी काम केले नाही पण आम्ही अनेक वेळा भेटलो. आपल्या आयुष्यामध्ये काय चुकीचे झाले? मी हैराण आहे कि आपण इतके मोठे कठोर पाऊल उचलले.
सरोज यांनी पुढे लिहिले आहे कि, तुम्ही याबद्दल एखाद्या वडिलधाऱ्या व्यक्तीसोबत बोलू शकत होता, जो तुमची मदत करू शकत होता. देव तुमच्या आ*त्म्या*ला शांती देवो आणि मला माहित नाही कि तुमचे वडील आणि बहिण काय करत आहेत. देव त्यांना या कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी बळ देवो. मी तुम्हाला सर्व चित्रपटांमध्ये पसंत केले आहे आणि नेहमी तुमच्यावर प्रेम करत राहीन. सरोज यांनी एक दोन तीन, धक धक करने लगा, हवा हवाई, मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियां हैं, तम्मा तम्मा, जरा सा झूम लूं मैं, ये इश्क हाय सारखे लोकप्रिय गाणी कोरियोग्राफ केले होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.