खूप जिद्दी आहे सौरव गांगुली ची मुलगी या मुळे झाली सोशल मीडियावर ट्रोल !

2 Min Read

आजकाल लहान मुले आई-वडिलांचे अजिबात ऐकत नाहीत खूप जिद्दी पणा करतात. ही गोष्ट पालकांना खूप खटकते. या अशा गोष्टी फक्त सामान्य लोकांच्या घरात घडतात असे नव्हे तर सेलिब्रिटींच्या बाबतीत सुद्धा असे होते. आज आपण बोलणार आहोत ते क्रिकेटचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा तसेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या मुलीबाबत. त्यांची मुलगी खूप हट्टी आहे हे दिसून आले. सोशल मीडियावर देखील तिला कित्येकदा ट्रोल केले गेले परंतु ती तरी सुधारत नाही असेच दिसून येते.

सौरव गांगुली हे असे खेळाडू आहेत ज्यांनी टीम इंडियाला लढायला शिकवले. आणि आता क्रिकेटमधून निवृत्त होऊन पुन्हा क्रिकेटच्या बीसीसीआय कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. भारतीय क्रिकेट टीमचा नवीन पाया घालून त्यांनी पिंक बोल डे नाईट टेस्ट सामन्याचे आयोजन करून पुन्हा एकदा त्यांची नेतृत्व क्षमता दाखवून दिली. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय टीम जिंकल्यानंतर चा फोटो शेअर केला जो फारच मजेशीर होता. याचबरोबर सौरव गांगुलीने टेस्ट मॅच च्या प्रेझेन्टेशन सर्मनी चे फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यात कोहली आणि त्याची टीम ट्रॉफी घेण्यासाठी उभे आहेत आणि गांगोली कोणत्या तरी कारणावरून थोडे नाराज दिसत आहेत.त्यांची नाराजी त्यांच्या मुलीला म्हणजेच सना गांगुलीला दिसली व तिने त्या फोटो खाली कमेंट केली ही अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही नाराज आहात. त्यावर सौरव गांगुली यांनी देखील मजेशीर उत्तर दिले, माझ्या नाराजीचे कारण हेच आहे की तू माझं ऐकत नाहीस. या कमेंटर वेळ न दवडता यावर सनाने रिप्लाय केला की ही गोष्ट तिने त्यांच्याकडूनच शिकली आहे. या कमेंट वर बीसीसी अध्यक्ष सौरव गांगुली कडे काहीच उत्तर नव्हते त्यामुळे निशब्द होऊन त्यांनी या कमेंट वर काहीही रिऍक्ट केले नाही. ईडन येथे बांगलादेशला 46 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी मात केली. गांगुलीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला कोलकाता येथे गुलाबी बॉलने कसोटी सामना खेळण्यासाठी पटवून दिले आहे. गांगुलीने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींना या विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *