आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर स्वतःची अशी वेगळी छाप सोडता यावी अशी प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्रीची मनापासूनची इच्छा असते. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणेच किंवा आपल्या स्वप्नातील पात्र साकारायची संधी मिळतेच असे नाही. अभिनयाच्या क्षेत्रात वावरताना कलाकाराला आपल्याला हवे ते पात्र साकारण्याची संधी मिळतेच असे नाही. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांच्या मनात नेहमीच कुतूहल असते. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या अथवा अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये असते. बरेचशे कलाकार आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच पुढाकार घेत असतात. त्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमाचा आपुलकीने स्वीकार करत असतात.

आपल्या 24- 24 तासांच्या अत्यंत व्यस्त दिनचर्येतून कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना दिसतात. कलाकारांच्या प्रेमापोटी अनेक चाहते आपल्या कलाकारांना एकदा भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी हवं ते करण्यासाठी सदैव तत्पर असतात. पण काहीही म्हणा या कलाकारांचं आणि त्यांच्या चाहत्यांचे नातं खरंच अनोखं आहे. त्याला मर्यादा देखील आहेत, पण त्यातील प्रेम आणि आपलेपणा अमर्यादित आहे. चला तर मग आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जीने आपल्या अभिनयाने अतिशय कमी काळात चाहत्यांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. ती सध्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत नसली तरी सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत तिने लाखो प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. मालिकेतील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने ती नेहमीच चर्चेत असते. मात्र ती सध्या चर्चेत आली आहे त्यामागचं कारण म्हणजे नुकताच तिचा झालेला साखरपुडा. होय बरोबर ऐकलंत तुम्ही, आणि हो तिचा होणार नवरा देखील एक अभिनेता आहे. कोण आहे ‘ती’ आणि ‘तो’ चला तर मग जाणून घेवूयात.मित्रांनो तुम्हाला “हे मन बावरे ” मधली अनुची खास मैत्रीण ‘नेहा’ आठवतेय का? हिच नेहा म्हणजेच अभिनेत्री “सायली परब”. अलीकडेच नेहा म्हणजेच सायलीने अनेक वर्षांपासून ओळख असलेल्या इंद्रनील शेलार सोबत साखरपुडा केलाय. आता हा इंद्रनील कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. इंद्रनील शेलार हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे.
त्याने फोटोग्राफीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच क्षेत्रात करीयर करण्याचा त्याचा मानस आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ‘Miss Teen India २०१९’ या इव्हेंटचा तो एक भाग बनला होता.इंद्रनील आणि सायली या दोघांनी अतिशय थाटात साखरपुडा केला आहे. सायली आणि इंद्रनील दोघेही एकमेकांना खूप आधीपासूनच ओळखतात. दोघांनी अनेक वर्षापासूनच्या मैत्रीच्या नात्याला आता एक वेगळं रूप दिलं आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर इंद्रनीलने साखरपुड्याचा फोटो देखील पोस्ट केला आहे. सायलीने आजवरच्या आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘हे मन बावरे’ या मालिकेत साकारलेलं ‘नेहा’ हे पात्र विशेष लक्षवेधी ठरलं. या पात्राने तिला एक वेगळी ओळख दिली आहे. पॉलिटिकल सायन्सची पदवी घेतलेल्या सायलीच्या पूर्वीपासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये शिकत असतानाच सायलीने अनेक नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.झी वाहिनीची चूक भूल द्यावी घ्यावी, तिन्ही सांज हे नाटक, सोनी मराठी या वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा, हुतात्मा ही वेबसिरीजदेखील तिने साकारली आहे. आजवर मिळालेल्या प्रत्येक भूमिकेला तिने न्याय देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. हे मन बावरे मालिकेमुळे सायलीला खरी ओळख मिळाली. सायली आणि इंद्रनील या दोघांनाही आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!