टीव्हीचे क्युट कपल देबिना बनर्जी आणि गुरमीत चौधरी यांच्या घरी पुन्हा एकदा छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. ४ महिन्यांपूर्वीच देबिनाने तिच्या पहिल्या मुलीला जन्म दिला होता आणि आता दोघे आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. आपल्या प्रेग्नंसीची माहिती अभिनेत्री देबिनाने आपल्या सोशल मिडिया हँडलवर एक पोस्ट शेयर करून दिली आहे. देबिनाने इंस्टाग्रामवर सोनोग्राफीच्या रिपोर्टसोबत आपला फोटो शेयर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेयर केली आहे.

देबिनाने जो फोटो शेयर केला आहे त्यामध्ये गुरमीत आणि तिची मुलगी लियाना देखील दिसत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये दुसऱ्या प्रेग्नंसीचा रिपोर्ट देखील आहे. देबिनाने हा फोटो शेयर करताच मित्रांसोबत चाहते आणि सेलेब्रिटी देखील तिला शुभेच्छा देत आहेत.

३५ व्या वर्षी अभिनेत्री देबिना बनर्जी दुसऱ्यांदा आई होणार आहे. देबिना आणि गुरमीतने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये दोघे मुलीसोबत व्हाइट आउटफिटमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आई होण्याचा आनंद देबिनाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

टीव्हीवरील राम-सीताच्या या जोडीनेने फोटो शेयर करताना लिहिले आहे कि काही निर्णय आधीपासूनच निश्चित असतात आणि कोणीही त्याला बदलू शकत नाही. हा खरच एक आशीर्वाद आहे. आम्हाला पूर्ण करण्यासाठी लवकरच कोणीतरी येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

प्रेग्नंसीची बातमी देबिना आणि गुरमीतच्या चाहत्यांसाठी खूपच खास आहे. हे स्टार कपल लग्नाच्या ११ वर्षानंतर आईवडील बनले होते. एप्रिल २०२२ मध्ये देबिनाने मुलगी लीयानाला जन्म दिला होता. आता दुसऱ्या प्रेग्नंसीच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये जसे आनंदाची लाट पसरली आहे.