जगातल्या प्रत्येक आई-वडिलांची हीच इच्छा असते की आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घेऊन आभाळात उंच भरारी घ्यावी. अनेक अडथळ्यांना मागे टाकत खूप यशस्वी व्हावं. त्यामुळे चांगल्या शाळांमध्ये क्लासेस मध्ये त्यांचं नाव दाखल करण्यासाठी आई वडील फार कष्ट घेत असतात. आजकाल मुलांना शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं ही खूप मोठी गोष्ट झाली आहे.

शाळा, कलासेसच्या फी फार वाढल्या आहेत; सोबतच वह्या, पुस्तके, शाळांचे गणवेश यांचा खर्च वेगळाच. पण मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी आपली जमापुंजी ते पणाला लावतात. भलेही आई-वडिलांना फार कष्ट घ्यावे लागत असतील पण ते आपल्या मुलांच्या शिक्षणात तसूभरही कमी करत नाहीत आज या शाळेच्या संदर्भावरून एका अनोख्या शाळेबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत की तुम्ही पूर्वी कधी ऐकले ही नसेल. आपल्या मुलांना या शाळेत शिकवण्यासाठी आपल्या मुलांना त्या शाळेत दाखल करण्यासाठी अक्षरशः आईवडिलांची रांगच रांग या शाळेबाहेर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या अनोख्या शाळेत आपल्या मुलांना शिकण्यासाठी पाठवणं, हे सगळ्यांनाच जमणे शक्य नाही. केवळ श्रीमंत घरातील मुले त्या शाळेत शिकू शकतात.
या अनोख्या शाळेचे नाव आहे धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल. ही शाळा मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधली होती. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही सात मजली असून ही २००३ मध्ये स्थापित झालेली आहे. या शाळेची सर्व जबाबदारी संचालन ही निता अंबानी स्वतः प्रामुख्याने सांभाळतात.
वर्षभराची या शाळेची फी तब्बल  १.७ लाख रुपये ते ४.४८ लाख रुपये आहे. या शाळेमध्ये पुढील बोर्डचा अभ्यासक्रम प्रामुख्याने घेतला जातो; आईसीएसई, आईजीसीएसई आणि आईबीडीपी. या शाळेचा वार्षिक महोत्सव म्हणजे बॉलिवूडमधील सर्व कलाकारांना भेटण्याची पर्वणी असते. हे कलाकार या वार्षिक महोत्सवात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी नव्हे तर आपल्या मुलाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी येतात. या शाळेमध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, रितिक रोशन या कलाकारांची मुले या अनोख्या शाळेमध्ये शिकतात. सिक्युरिटीचा परवानगीशिवाय कोणीही शाळे मध्ये प्रवेश करू शकत नाही. क्वचितच एखादी अत्याधुनिक सेवा या शाळेमध्ये नसावी.