आमिर खानसोबत विवो फोनच्या जाहिरातीमध्ये काम केलेल्या टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माने मुंबईमध्ये शुक्रवारी आपल्या राहत्या घरी आपले आयुष्य संपवले. तिचा मृतदेह शुक्रवारी मंबईमधील मीरा रोड स्थित तिच्या घरी मिळाला. सेजलला दिल तो हैप्पी है जी या सिरीयल मधून खूप लोकप्रियता मिळाली होती.

पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोट देखील मिळाली आहे. सेजलच्या अत्महत्येच्या बातमीने बॉलीवूड आणि टीव्ही जगतामध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता कुशल पंजाबीने सुद्धा आत्महत्या केली होती. टेलीव्हिजनचे बरेच कलाकार हे मीरा रोडच्या भागामध्ये राहतात कारण हा भाग टेलीव्हिजन शोजच्या शुटींगसेटच्या जवळ आहे.पोलिसांनी सांगितले कि सेजल आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूपच अस्वस्थ होती. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची आपल्या मित्रांच्यासोबत फोनवर बातचीत झाली होती. पोलिसांनी हे मानले आहे कि सेजलने डिप्रेशनमध्ये येऊन हे सर्व केले आहे. सेजल मीरा रोड पूर्व मध्ये रॉयल नेस्ट सोसाइटी येथे आपल्या मित्रांच्यासोबत राहत होती.
पोलिसांनी पुढे सांगितले कि सेजलच्या घरामध्ये एक सुसाइड नोट मिळाली आहे ज्यामध्ये तिने याचे कारण स्पष्ट केलेले नाही. सेजलने टीव्ही सिरीयलमध्ये काम करण्यापूर्वी जाहीरातींमध्ये काम केले होते. ती राजस्थानची रहिवाशी आहे आणि ३ वर्षांपूर्वीच ती आपल्या आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मुंबईला अ‍ॅक्ट्रेस बनण्यासाठी आली होती.