शगुफ्ता रफीकच्या आयुष्याची स्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. लहानपणी तिच्यासोबत एक अशी घटना घडली होती कि तिचे आयुष्यच बदलून गेले होते. शगुफ्ता अनाथ होती आणि तिला अनवरी बेगमने मोठे केले. अनवरी बेगमने शगुफ्ताला ते सर्व काही दिले ज्याची ती हकदार होती. पण लवकरच एक अशी वेळ आली जेव्हा तिला गरिबीच्या चादरीने पूर्णपणे झाकले. अनवरीला घर चालवण्यासाठी स्वतःच्या बांगड्या देखील विकाव्या लागल्या. घरची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची झाली होती. गरजेमध्ये अनवरी शगुफ्ता रफीकचा आधार बनली होती आणि आता शगुफ्ताची वेळ होती तिने तिचे उपकार फेडावे.

यामुळे वयाच्या १२ व्या वाशी शगुफ्ताने प्राईव्हेट पार्टीमध्ये नाचायला सुरुवात केली. ह्या पार्ट्या काही सामान्य पार्ट्या नव्हत्या. तर इथील वातावरण एका कोठीसारखे होते. जिथे मोठ मोठे लोक आपल्या प्रेमिकांसोबत आणि वे श्यांसोबत येत असत. शगुफ्ता नाचायची आणि ते लोक पैसे फेकायचे. पैसे पाहून शगुफ्ता रफीक अशी खुश व्हायची कि तिला आता सर्वकाही मिळाले आहे. ज्या कुटुंबाने शगुफ्ताला मोठे केले, आधार दिला त्यांच्या परतफेड करण्याच्या चक्करमध्ये शगुफ्ता त्या पार्ट्यांमध्ये नाचायची आणि तिच्यावर पैशांचा पाऊस व्हायचा.

हे चक्र वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत चालू होते आणि त्यानंतर तो भयानक काळ लाल ज्याची जाणीव स्वतः शगुफ्ता रफीकला देखील नव्हती. शगुफ्ता आता वे श्या वृति कडे वळू लागली होती. अनेक वर्षे हे चालू राहिले. शगुफ्ताच्या आईला माहिती होते कि ती वे श्या वृति करत आहे. पण शगुफ्ता मनामधून खूपच खुश होती कि कारण ती आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवत होती. त्यांना ते सर्वकाही देऊ शकत होती ज्याचे ते हकदार होते. शगुफ्ता दिलासा होता कि आता तिच्या आईला बसमध्ये धक्के खावे लागत नव्हते.

जास्त पैसे कमवण्याच्या आशेने शगुफ्ता रफीक दुबईपर्यंत देखील पोहोचली आणि तिथे ती डांसर म्हणून काम करू लागली. पण तिच्या आईच्या आजारामुळे तिला परत यावे लागले. कॅन्सरने तिच्या आईचा मृत्यू झाला आणि तिच्यावर संकटांचा डोंगरच कोसळला. पण शगुफ्ता रफिक घाबरली नाही.
नंतर तिच्या आयुष्यामध्ये एक सुवर्णकाळ आला जेव्हा तिची भेट महेश भट्टसोबत झाली. महेश भट्टच्या सपोर्टमुले शगुफ्ताचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. शगुफ्ता रफीकला लेखनाची खूप आवड होती आणि भट्ट कॅम्पसोबत तिने लेखन सुरु केले. आजच्या काळामध्ये अनेक चित्रपटांची स्टोरी लिहिणारी शगुफ्ता रफीक हिट चित्रपटांची गॅरंटी बनली आहे. भट्ट कॅम्पसाठी तिने अनेक चित्रपटांच्या कथा आणि संवाद लिहिले आहेत. ज्यामध्ये आवारापन, राज, मर्डर २, आशिकी २ सारखे अनेक हिट चित्रपट आहेत.