बॉलीवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहिद कपूर गेल्या १६ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. लहानपणी शाहिद कपूर खूपच खोडकर होता. पण आज तो तितकाच सिरीयस व्यक्ती आहे. शाहिद कपूरला लहानपणी गिफ्ट घेणे खूप आवडत होते.

जसे प्रत्येक लहान मुलाला आपल्या वाढदिवशी हे जाणून घेण्याची उत्सुकता असते कि त्याला कोणते गिफ्ट मिळणार आहे. तशीच अवस्था शाहिद कपूरचीही होती. शाहिद कपूरने एकदा आपल्या वाढदिवसा संबंधी एक किस्सा सांगितला. शाहिद कपूर म्हणाला कि लहानपणी तो गिफ्टचा खूपच शौकीन होता. त्याला रंगीबेरंगी गिफ्ट खूप आकर्षित करत असत.शहीद कपूर म्हणाला – लहानपणी मी पाहुण्यांच्या हातातून गिफ्ट घेऊन पळून जायचो. माझ्या आईला नेहमी या कारनाम्यामुळे खाली मान घालावी लागत असे. परंतु मी कधीच बदललो नाही. ती मला पाहुण्यांना माफी मागायला सांगायची तेव्हा मी रंगीबेरंगी गिफ्टकडेच बघत बसत होतो. शाहिद कपूरसुद्धा इतर मुलांसारखा लहानपणी खूप मस्ती करायचा. परंतु आता त्याची इच्छा आहे कि मिशा आणि जैन यांनी असे वागू नये.शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी जर्सी चित्रपटाच्या रिमेकच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे शुटींग सध्या चंदीगडमध्ये सुरु आहे. शाहिदने हेसुद्धा सांगितले कि तो वाढदिवशी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. परंतु शुटींगमधून ब्रेक घेणार नाही.