नुकतेच बिग बोसचा विजेता सिद्धार्थ शुक्ला या जगामधून निघून गेला आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याच्यासंबंधीत जुना व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाला बिग बॉस ओटीटीच्या संडे का वार एपिसोडमध्ये करण जौहरसोबत दिसले होते. बिग बॉस ओटीटीच्या मंचावर दोघांनी खूपच मस्ती केली होती. शहनाज गिलने एपिसोडदरम्यान सिद्धार्थ शुक्लाचे बेडरूम सिक्रेट उघड केले होत. बिग बॉस ओटीटीच्या मंचावर शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाने करण जौहरच्या कभी खुशी कभी गम चित्रपटामधील सूरज हुआ मद्धम गाण्यावर डांस केला होता.

शहनाज आणि सिद्धार्थच्या डांसदरम्यान दोघांची केमेस्ट्री खूपच पाहण्यासारखी होती. तथापि या परफॉर्मेंस नंतर शहनाज आणि सिद्धार्थने खूपच पस्ती केली होती. शोच्या मंचावर शहनाज गिलने सिद्धार्थ शुक्लाच्या बेडरूम सिक्रेट उघड केले होते. शहनाज म्हणाली होती कि सिद्धार्थ शुक्लाच्या बेडरूममध्ये तुम्हाला एक लोक्ष्ण मिळेल, जे तो आपल्या पायाला लावतो. या सिक्रेटच्या खुलास्यानंतर चाहते हैराण झाले होते.

बिग बॉस १३ मधून लोकप्रियता मिळवणारी पंजाबची कॅटरीना कैफ म्हणजेच शहनाजचा भाऊ शहबाजने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला खास ट्रिब्यूट दिले आहे. शहनाजच्या भावाने आपल्या हातावर अभिनेत्याच्या चेहऱ्याचा टॅटू काढला आहे.