बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण ती आपल्या चाहत्यांपासून दूर नाही. सोशल मिडियाच्या माध्यमातून ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत जोडलेली असते आणि नेहमी ती आपले फोटो शेयर करत असते. त्याचबरोबर ती टिकटॉकवर देखील अॅ क्टिव असते. नुकतेच तिने तिच्याबद्दल आणि तिची बहिण शमिता शेट्टीबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे.

शिल्पा शेट्टीने नुकतेच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे कि ती तिची छोटी बहिण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीवर खूपच जळायची कारण ती तिच्यापेक्षा दिसायला खूपच सुंदर होती. शिल्पाने सांगितले कि माझ्या वडिलांनी मला सांगितले कि एके वर्षी मला खूपच वेगळे वाटले. शमिता सुंदर होती तर माझा रंग सावळा होता. तेव्हा मी तिच्यावर खूपच जळायचे. मी बऱ्याचदा माझ्या आईला विचारले कि तू तिला इतके सुंदर का बनवलेस आणि मला काळे बनवलेस.शिल्पा शेट्टीने स्वतः सांगितले कि कशाप्रकारे ती तिची बहिण शमितासोबत वाईट वर्तवणूक करायची. तिने सांगितले कि जेव्हा शमिता रात्री झोपायची तेव्हा मी तिची वेणी कापून टाकायचे, ज्यामुळे शमिता खूपच रडायची. शिल्पाने सांगितले कि जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी आमच्यामध्ये खूप भांडणे होत होती. एकदा मी शमिताला वडिलांच्या कपाटामध्ये बंद केले होते. इतकेच नाही तर शिल्पाने सांगितले कि ती लहानपणी खूप भांडखोर होती आणि एकदा तर तिने शमिताला दगड देखील मारला होता ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर जखम झाली होती.
शिल्पाने सांगितले कि जेव्हा शमिता शेट्टीने मोहब्बते चित्रपटामधून सुरवात केली होती तेव्हा तिला वाटले होते कि आता तिच्याजवळ कोणतेही काम नसेल. शिल्पा म्हणाली कि मला नेहमी वाटायचे कि ती माझ्यापेक्षा खूप सुंदर दिसायची. ती एक चांगली अभिनेत्री आणि डांसर आहे. यामुळे मी विचार केला कि जेव्हा तिने तिची सुरवात केली होती, तेव्हा मला कोणी काम देणार नाही.