शिल्पा शेट्टी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे जी दिसायला खूपच सुंदर आहे. शिल्पा शेट्टीला फिटनेस क्वीन म्हणून ओळखले जाते. शिल्पा शेट्टी बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. पण लवकरच ती चित्रपटामध्ये पुनरागमन करणार आहे. शिल्पा शेट्टी निकम्मा चित्रपटामधून पुनरागमन करत आहे.

शिल्पा शेट्टीने २००९ मध्ये बिजनेसमॅन राज कुंद्रासोबत लग्न केले होते. शिल्पा शेट्टी राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्राचे पहिले लग्न कवितासोबत झाले होते. पण २००६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर कविता कुंद्राने शिल्पा शेट्टीवर हा आरोप लावला होता कि तिच्यामुळे त्यांचे घर मोडले होते.कविता कुंद्रा म्हणाली होती कि तिचा आणि राज कुंद्राचा घटस्फोट शिल्पा शेट्टीमुळेच झाला होता. राज आणि शिल्पा शेट्टीची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. पहिल्यांदा ते बिजनेस संदर्भात भेटले होते. पण नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले.
राज कुंद्राची पहिली पत्नी कविता दिसायला खूपच सुंदर आहे. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्रा आणि शिल्पाशेट्टीच्या घरी एक लहान परी आली आहे. शिल्पा शेट्टी सरोगेसी द्वारे आई बनली असून तिने आपल्या मुलीचे नाव समिशा ठेवले आहे. शिल्पा शेट्टीचा एक मुलगा देखील आहे ज्याचे नाव किआन असून तो ७ वर्षांचा आहे.