या कारणामुळे अमजद खानला धर्मेंद्रची मागावी लागली होती माफी, रंजक आहे शोले चित्रपटाचा हा किस्सा !

2 Min Read

रमेश सिप्पीच्या शोलेला भारतीय सिनेमाच्या इतिहासामध्ये आतापर्यंतच्या सर्वात महान चित्रपटांपैकी एक मानले जाते. सर्व भूमिकांमधील एक विशेष नाव आहे जे कोणीही विसरू शकत नाही आणि ते आहे गब्बर सिंह. या चित्रपटामध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन सारखे दिग्गज कलाकार होते आणि त्यांच्या मध्ये अभिनेता अमजद खानला चित्रपटामध्ये हि भूमिका साकारल्यामुळे खूप प्रशंसा मिळाली. तथापि शोलेच्या शुटींग दरम्यान त्यांचा सुरवातीचा प्रवास कठीण होता. अमजद खानचा आवाज खूपच गोड होता ज्यामुळे क्रू मेंबर्स त्याच्यावर नाखूष होते.याचे कारण हे आहे कि त्यांना गब्बरच्या भूमिकेसाठी भारी आवाज हवा होता. एका बातमीनुसार त्यांना चित्रपटामधून जवळ जवळ काढून टाकण्यात आले होते पण त्यांना आपल्या भूमिकेमध्ये फिट बसण्यासाठी नंतर सराव करण्याची संधी देण्यात आली. शेवटी अमजद खानने अनेक दिवस सराव केल्यानंतर शोले चित्रपटाची शुटींग सुरु केली. एकदा स्टार कास्ट चित्रपटाच्या एका सीनची शुटींग करत होते ज्यामध्ये बसंती म्हणजेच हेमा मालिनीला गब्बर आणि त्याच्या लोकांच्या समोर नाचण्यासाठी भाग पाडले गेले होते.या सीन नुसार गब्बर सिंहने बसंतीला आपला प्रेमी विरू म्हणजेच धर्मेंद्रचा जीव वाचवण्यासाठी नाचण्यासाठी भाग पाडतो. अमजद खान आपल्या भुमिकेमध्ये इतके गुंतून गेले होते कि त्यांनी हेमा मालिनीचा हात खूपच घट्ट पकडून ठेवला होता ज्यामुळे हेमाला अनेक दिवस त्रास सहन करावा लागला. जेव्हा धर्मेंद्रला याबद्दल समजले तेव्हा तो अमजद खानवर नाराज झाला. नंतर त्यांनी माफी मागितली पण काही फायदा झाला नाही. तथापि अमजद खान शोलेच्या शुटींगच्या शेवटपर्यंत धर्मद्र आणि अमिताभ बच्चन सहित सर्वांचे चांगले मित्र बनले.अमजद खानने या भूमिकेबद्दल आणखीन एक गोष्ट सांगितली होती कि त्यांच्या पॉपुलर डायलॉग कितने आदमी थे… ला शूट करण्यासाठी त्यांना ४० रिटेक द्यावे लागले होता. ४० वेळा चित्रीकरण केल्यानंतर यामधील एक सीन फाईनल करण्यात आला.शोले १९७५ मध्ये प्रदर्शित झाला होता जो सलीम-जावेद यांनी लिहिला होता. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा याला निगेटिव क्रिटिकल रीव्यूज मिळाले पण माउथ पब्लिसिटीमुळे हा बॉक्स ऑफिस हिट राहिला. या चित्रपटाने देशभरामध्ये अनेक थिएटर्समध्ये सतत शोबरोबर अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आणि मुंबईच्या मिनरवामध्ये तर हा चित्रपट ५ वर्षे चालू होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *