बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आपल्या आगामी बागी ३ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट बागी ३ प्रदर्शनासाठी तयार आहे. प्रमोशनच्या आधीही टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर एकत्र पाहायला मिळाले होते.

अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरची जोडी खूपच क्युट दिसते. या दोघांनी याआधीची चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. बागी सिरीजचा पहिल्या चित्रपटामध्ये देखील हे दोघे एकत्र काम करताना पाहायला मिळाले होते या दोघांना मोठ्या पडद्यावर दर्शक खूपच पसंत करतात.टायगर आणि श्रद्धा बालपणीचे खूपच चांगले मित्र आहेत. दोघेही स्टार किड्स आहेत, यामुळे हे दोघे लहानपणापासूनच भेटत आहेत. याशिवाय दोघेही एकाच शाळेमध्ये शिकत होते. प्रसिद्ध अमेरिकन स्कूल ऑफ मुंबईमध्ये दोघेही एकाच क्लासमध्ये शिकत होते. श्रद्धाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि टायगर खूपच लाजाळू आहे.

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा रोमान्स आणि अॅाक्शन पॅक चित्रपट बागी ३ चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. नुकतेच चित्रपटाचा आणखीन एक ट्रेलर आणि दस बहाने २.० हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला दर्शकांचा बरा रिस्पॉन्स भेटला आहे. लवकरच टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत.अहमद खान दिग्दर्शित बागी ३ चित्रपटामध्ये रितेश देशमुख, विजय वर्मा, अंकिता लोखंडे यांच्याहि महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. बागी सिरीजच्या दुसऱ्या चित्रपटामध्ये दिशा पटानी टायगर श्रॉफसोबत पाहायला मिळाली होती. आता तिसऱ्या चित्रपटामध्ये देखील दिशा पाहायला मिळणार आहेत परंतु दिशाच हा कॅमिओ रोल असणार आहे.