पॉपुलर टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या सोनी टीव्ही वर प्रसारित होणारी सिरीयल मेरे डैड की दुल्हन मध्ये पाहायला मिळत आहे. मेरे डैड की दुल्हन स्टार श्वेता तिवारीने आपला को-स्टार फहमान खानसोबत प्रेजेंट आणि पास्टवाली एक गोष्ट शेयर केली आहे. तिने एक फोटो शेयर करून फहमानमध्ये झालेला बदल दाखवला आहे. श्वेता द्वारा शेयर केलेला हा फोटो फहमानच्या बालपणीचा आणि आताचा फोटो आहे, ज्यामध्ये १६ वर्षांचा फरक आहे.

त्यांनी लिहिले आहे कि, हे तर खूप भयंकर आहे, किती वेगाने वेळ निघून जात आहे. हा २००४ मध्ये मला भेटला होता आणि २०२० मध्ये हा पुन्हा मला भेटला आहे. १६ वर्षांनंतर श्वेता तिवारीचा को-स्टार फहमान खानमध्ये खूपच बदल झाला आहे. परंतु श्वेताला जर पाहिले तर तिच्यात जास्त बदल झालेला जाणवून येत नाही.अभिनेत्री श्वेतासोबतचा फहमानचा हा फोटो २००४ मधील आहे. यामध्ये फहमान श्वेतासमोर एक लहान मुलगा दिसत आहे. तर त्यांचा आताचा फोटो पाहिला तर दोघेही एकाच वयाचे वाटत आहेत. श्वेताच्या चेहऱ्यावर कोणताच फरक दिसत नाही. त्यांच्या या फोटोवर सेलेब्सनी खूप कमेंट देखील केल्या आहेत. अस्मित पटेलने लिहिले आहे कि, तू आजही तशीच दिसतेस. टीव्ही अ‍ॅक्ट्रेस निधी उत्तमने लिहिले आहे कि, तुम्ही फहमानपेक्षा जास्त तरुण दिसत आहात.मेरे डैड की दुल्हन या सिरीयल बद्दल बोलायचे झाले तर या शोला दर्शकांचा चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. यामध्ये श्वेता तिवारी आणि वरुण बडोला लीड रोलमध्ये आहेत. त्यांच्याशिवाय अंजली ततरारीने वरुण बडोलाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. फहमान खानहि सध्या सोनी टीव्हीवरील हिट सिरीयल मेरे डैड की दुल्हन मध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये तो रणदीप नावाची भूमिका साकारत आहे. याआधी फहमानने वादा रहा, कुंडली भाग्य आणि क्या कसूर है अमाला का या सिरीयलमध्ये दर्शकांना आपल्या अ‍ॅक्ट‍िंगने प्रभावित केले आहे.