बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातपास अजून सुरु आहे. यादरम्यान सीबीआईला सुशांतची पर्सनल डायरी मिळाली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या वैयक्तिक अनुभव आणि प्लानिंगची नोंद करून ठेवत होते. पण डायरीचे काही पाने गायब आहेत. तर गायब झालेल्या या पानांबद्दल जबरदस्त गदारोळ झाला आहे. प्रत्येकाला या फाटलेल्या पानांबद्दल जाणून घ्यायचे आहे. तर आता स्वतः सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठानीने या प्रकरणाबद्दल खुलासा केला आहे.सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंहचे वकील विकास सिंह यांनी या डायरीचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले होते कि डायर मिळाल्यानंतर अनेक खुलासे होऊ शकतात. एका न्यूज वेबसाईटने दावा केला आहे कि त्यांना सुशांतची पर्सनल डायरी मिली आहे, ज्याची काही पाने फाटली आहेत. चॅनेलचा असा दावा आहे की डायरीत एका नावाचा उल्लेख देखील आहे, ज्यानंतर पाने गायब केली गेली आहेत. तर या चॅनेलसोबत बातचीत करताना सिद्धार्थ पीठानीने सुशांतच्या डायरीमधून गायब पानांबद्दल खुलासा केला आहे.त्याने आधी तर सांगितले होते कि डायरीमध्ये काही पाने दिसले नाहीत. पण त्याने हे देखील सांगितले कि सुशांत अनेकवेळा आपल्या डायरीची पाने फाडत असे. ज्यामध्ये त्याला स्वतः लिहिलेली एखादी गोष्ट आवडत नसे. सिद्धार्थचा दावा आहे कि त्याने अनेक वेळा डायरी लिहिताना पाहिले आहे तो आपल्या डायरीमध्ये लिहित होता कि तो जगामधील किती जीनियस लोकांना भेटू इच्छित होता.याआधी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने देखील आपल्या मुलाखतीमध्ये म्हंटले होते कि सुशांत पर्सनल डायरी लिहित होता. अंकिताने तेव्हा सांगितले होते कि जेव्हा सुशांत तिच्यासोबत होता तेव्हा देखील त्याने येणाऱ्या पाच वर्षाचे नियोजन डायरीमध्ये केले होते आणि पुढच्या पाच वर्षामध्ये ती कामे केली.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.