तुम्ही यापैकी कोणत्या पद्धतीमध्ये झोपणं पसंद करता, त्यावर तुमचा स्वभाव ठरतो !

4 Min Read

तुम्ही यापैकी कोणत्या पद्धतीमध्ये झोपणं पसंद करता, त्यावर तुमचा स्वभाव ठरतो ! आपल्या दिनचर्येतील सर्वात महत्त्वपूर्ण अंग शयन आहे. शयन म्हणजे झोप. मनुष्य, पशु-पक्षी, झाडे-झुडपं सर्वजण शयन करतात. झोप कशाप्रकारे आल्या स्वास्थ्य आणि चेतनेसाठी लाभदायक ठरू शकते, यासाठी शास्त्रामध्ये विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. झोपताना पाय दक्षिणेकडे असू नयेत आणि उत्तर दिशेकडे डोके ठेवून झोपू नये. अशा स्थितीमध्ये झोपल्यास मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये झोपण्याशी संबंधित सांगण्यात आलेल्या काही खास गोष्टी. दिवसभर काम करून आपण थकून जातो. आपल्या शरीरातील उर्जा कमी होते. अशावेळी शरीराला आरामाची आवश्यकता असते. शरीराला आराम देण्यासाठी आपण झोपतो. जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा स्वतःमध्ये ताजेपणा, स्फूर्तीचा अनुभव करतो. झोपल्यानंतर आपल्यामध्ये पुन्हा उर्जा एकत्र होते, ज्यामुळे आपल्याला काम करण्याची ताकद मिळते. झोपेचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे. याच कारणामुळे आपल्या ऋषीमुनींनी या संदर्भात काही नियम तयार करून ठेवले आहेत. या नियमांचे पालन केल्यास झोपेचा अधिकाधिक लाभ प्राप्त होऊ शकतो. संध्याकाळी झोपू नये, झोपताना पाय दक्षिणेकडे करू नयेत असे निर्देश शास्त्रामध्ये देण्यात आले आहेत.

दोन्ही हात आणि पाय पसरवून पाठीवर झोपणे –
जे लोकं या पद्धतीने झोपतात ते लोकं आपल्या हातातील काम पूर्ण स्वातंत्र्य घेऊन करतात. या लोकांना सर्व सुख – सोई प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात. सामान्य पद्धतीने पाहिलं तर या लोकांना जीवनात अनेक सुख – सुविधा प्राप्त करण्याचा मोह या लोकांना असतो. हे लोक सुंदरतेकडे खास करून आकर्षित होतात.

पोटावर उलट्या पद्धतीने झोपणं –
ज्या लोकांना पोटावर झोपूनच चांगली झोप लागते. ते लोकं कधी कधी संकुचित मानसिकतेचे असतात. हे लोकं थोडे स्वार्थी देखील असतात. असे झोपणारे लोकं अनेकदा आपल्या मित्र परिवारासोबत अधिक वेळ घालवतात. या लोकांना कधी आपल्या मित्रपरिवाराची गरज लागते. या लोकांनी आपल्या झोपण्यात बदल केला तर त्यांना अधिक लाभ होण्याची शक्यता असते.

स्वतःला पूर्णपणे झाकून झोपणारे लोक –
जे लोकं असे झोपतात. ते गर्दीत स्वतःला शक्तीशाली आणि फ्रेंडली दाखवतात. मात्र हे लोकं खूप लाजरे आणि कमजोर असतात. हे लोकं दुसऱ्यांने अनेक गुपित मनात ठेवून असतात. जर लोकांच्या जीवनात काही समस्या आली तर ते स्वतः त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतात.

एका कुशीला झोपणं –
जे लोकं एका कुशीवर झोपणं पसंद करतात ते अधिक आत्मविश्वासू असतात. आणि त्यांना प्रचंड यश मिळतं. हे लोकं आपल्या उत्साहात आणि प्रयत्नात कुठेही कमी पडत नाही. यामुळे ते लोकं जे कोणतं काम हाती घेतात. त्यामुळे त्यांना यश हे मिळतंच.

पाठीवर झोपणे आणि दोन्ही पाय क्रॉस करणे –
जे लोकं पाठीवर झोपतात. आणि आपले पाय एकमेकांवर क्रॉस अशा पद्धतीने ठेवतात. ते लोकं कोणत्याही थराला जाऊन आपला क्रेझिनेस पूर्ण करू शकतात. या लोकांना एखादं काम हाती घेतलं की ते संपवे पर्यंत धीर नसतो. हे लोकं कोणत्याही संकटाला अगदी आरामात दूर करतात.

कुस बदलणे आणि शरीर जवळ घेऊन झोपणं –
काही लोकं कुस बदलून झोपतात. आणि पूर्ण शरीर एकत्र करून झोपतात. त्यांचा स्वभाव स्वार्थी असतो. हे लोकं आपल्या निव्वळ स्वार्थासाठी मैत्री करतात. या प्रकाराने झोपणारे लोकं तामसिक प्रवृत्तीचे असतात.

सरळ झोपणे आणि हात डोक्याखाली घेणं –
जे लोकं सरळ झोपतात. आणि दोन्ही हातांना डोक्याखाली घेऊन झोपतात. ते लोकं बुद्धीमान असतात. हे लोकं नवीन गोष्ट शिकण्यासाठी कायम तत्पर असतात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *