स्मृती कालरा टीव्ही सिरीयल दिल संभल जा जरा मध्ये बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा भाऊ संजय कपूरसोबत अभिनय करताना पाहायला मिळाली होती. या सिरीयलमधून अभिनेत्री स्मृती कालराला खरी ओळख मिळाली होती. संजय कपूरसोबत तिचे नाव देखील जोडले गेले होते. करियरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्मृती कालराने प्यार तूने क्या किया आणि करोल बाघ सारख्या सिरीयलमध्ये काम केले.ती टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, परंतु सध्या ती अभिनयापासून दूर आहे. आजकाल स्मृती कालरा आपला पूर्ण वेळ आपली आई आणि कुटुंबासोबत घालवत असते. ३२ वर्षाच्या या अभिनेत्रीने आपल्या आईसाठी आपल्या करियरला ब्रेक दिला आहे. खरे तर तिच्या आईची तब्येत ठीक नसते यामुळे जवळजवळ एक वर्षापासून तिने कोणत्याही शोमध्ये काम केलेले नाही.
कहाँ हम कहाँ तुम हि सिरीयल खूपच चांगली चालत आहे त्यामध्ये काम करण्यासाठी स्मृतीला प्रथम ऑफर मिळाली होती, परंतु आईची काळजी घेण्यासाठी तिला या शोला नकार द्यावा लागला. बातमीनुसार स्मृतीला तीच भूमिका ऑफर झाली होती जी आता दीपिका कक्कड साकारत आहे.
तसे तर सोशल मिडियावर स्मृती खूपच अॅीक्टिव असते. ती टीव्हीपासून भले हि दूर आहे पण सोशल मिडीयावर नेहमी ती आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. एक दिवससुद्धा ती सोशल मिडियापासून दूर नाही राहू शकत. ती नेहमी आपले फोटो शेयर करत असते. तिचे फॅन्सदेखील तिच्यासाठी वेडे असतात.