सुपरस्टार राजकुमारचा बुलंद आवाज आणि त्यांच्या दमदार अभिनयाचे सर्व फॅन आहेत. आपल्या उत्कृष्ठ डायलॉगने दर्शकांना रोमांचित करणारे राजकुमार यांना आज ओळखत नसेल असे कोणी नाही. आजदेखील स्वातंत्र्यदिनी राजकुमारचे चित्रपट पाहायला मिळतात. पण आज आपण त्यांच्या मुलाबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही त्याला चित्रपटामध्ये नक्कीच पाहिले असेल पण त्याला ओळखू शकला नसाल कि हा राजकुमारचा मुलगा आहे.

राजकुमारच्या मुलाचे नाव पुरू राजकुमार आहे. पुरू राजकुमार आपल्या वडिलांसारखाच लोकप्रिय आहे. पुरू राजकुमार दिवंगत अभिनेता राजकुमारचा मुलगा आहे. त्याला हिट अँड रन प्रकरणामध्ये देखील अटक झाली होती. ज्यामध्ये फुटपाथवरील झोपणारे अनेक लोक मारले गेले होते. तथापि तो कधीच यामध्ये दोषी आढळला नाही. पुरू राजकुमार महान अभिनेता राजकुमार आणि त्यांची पत्नी गायत्रीचा मुलगा आहे. तो तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा आहे.त्याने ग्रेटिट्सबर्ग कॉलेज, पेनसिल्व्हेनिया येथून अर्थशास्त्र, मनोविज्ञान आणि थिएटरचा कोर्स केला आहे आणि त्याला रॉक क्लाइंबिंग, हॉर्स राइडिंग, स्कूबा डायव्हिंग, टेनिस आणि स्क्वॉश असे खेळ देखील आवडतात. कधाचित असे होऊ शकते कि तुम्ही कधी याकडे लक्षच दिले नसेल कि तो कोण आहे. तसे तर बॉलीवूडमध्ये नेहमी अनेक स्टार्सची मुले येत राहतात पण पुरूने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सुपरस्टार राजकुमारचा मुलगा पुरू राजकुमारने १९९६ मध्ये बाल ब्रम्हचारी चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट त्याच्या वडिलांच्या मृत्यूच्या तीन महिन्यानंतर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास प्रदर्शन करू शकला नाही.

तीन वर्षानंतर पुरू हमारा दिल आपके पास है चित्रपटामध्ये विलेनच्या भूमिकेमध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट राहिला होता. त्याने मिशन कश्मीर चित्रपटामध्ये कॅमिओ रोल देखील केला होता जो त्याच वर्षी प्रदर्शित झाला होता. अनेक बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तो गुरखा सैनिक म्हणून मल्टी-स्टारर चित्रपट एलओसी कारगिलमध्ये दिसला होता.

यानंतर त्याने उमराव जान (२००६) मध्ये काम केले. उमराव जाननंतर सुपरस्टार राजकुमारचा मुलगा पुरूने २००७ मध्ये दोष, २००९ मध्ये दुश्मनी २०१० मध्ये वीर आणि २०१४ मध्ये अॅगक्शन जॅक्सन सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. राजकुमारला पुरू शिवाय एक मुलगी देखील आहे जिचे नाव वास्तविका राजकुमार असे आहे. ती देखील एक चित्रपट अभिनेत्री आहे.

काही वर्षांपूर्वी वास्तविका तेव्हा चर्चेमध्ये आली होती जेव्हा अभिनेता शाहिद कपूरने तिच्या विरुद्ध पाठलाग करण्याची तक्रार दाखल केली होती. शाहिदनुसार एक महिला प्रशंसक बऱ्याच दिवसांपासून त्याचा पाठलाग करत होती. चौकशीनंतर हे सिद्ध झाले कि ती दुसरी कोणी नाही तर राजकुमारची मुलगी वास्तविका राजकुमार होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.