बॉलीवूड फिल्मी जगतातील सुंदर अभिनेत्रींमध्ये सोनाली बेंद्रेचे नाव घेतले जाते. सोनाली बेंद्रे जेवढी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच ती एक सुंदर व्यक्ती देखील आहे. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये एक अ‍ॅक्टर आणि अ‍ॅक्ट्रेस मध्ये अफेयरच्या बातम्या नेहमी येत असतात. परंतु सोनाली बेंद्रे एक अशी अ‍ॅक्ट्रेस आहे की ती या प्रसिद्ध बॉलीवूड अ‍ॅक्टरच्या प्रेमात तर पडली होती पण हि गोष्ट त्याच्यासमोर कधीच उघड केली नाही.बॉलीवूड फिल्म जगतामध्ये आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावणारा अभिनेता सुनील शेट्टी सध्या लाईमलाईट पासून दूरच असतो. त्याच्या काळामध्ये त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अ‍ॅक्शन आणि स्टाईलसाठी फेमस असलेला सुनील शेट्टी आपल्या चित्रपटांसोबत आपल्या अफेयरसाठी देखील खूप चर्चेमध्ये राहिला होता आणि विवाहित असून देखील फिल्म जगतातील एका अभिनेत्रीने त्याचे हृदय चोरले होते. त्या अभिनेत्रीसोबत सुनील शेट्टीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
इथे ज्या अभिनेत्रीबद्दल आम्ही बोलत आहोत ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आहे. अभिनेत्री सोनालीसाठी सुनीलच्या मनात देखील प्रेम निर्माण झाले होते. ९० च्या दशकामध्ये सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे यांची जोडी सर्वात जोडींपैकी एक होती. दोघे अनेक चित्रपटांमध्ये रोमांस करताना पाहायला मिळाले होते. दोघांनी टक्कर (१९९५), सपूत (१९९६) आणि कहर (१९९७) सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
बॉलीवूड अ‍ॅक्टर सुनील शेट्टी विवाहित असूनदेखील त्याचे सोनाली बेंद्रेवर प्रेम जडले होते. सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रेने टक्कर, सपूत, कहर आणि भाई अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटांमधील त्यांची जोडी लोकांना खूपच पसंत पडली होती आणि ९० च्या दशकात ही जोडी खूपच प्रसिद्ध मानली जात होती. चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यामुळे सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे यांनी बराच काळ एकत्र घालवला आणि यादरम्यान सुनील शेट्टीचे सोनाली वर प्रेम जडले होते. परंतु सुनील शेट्टी सोनाली बेंद्रेसमोर कधीही आपले प्रेम व्यक्त करू शकला नाही, कारण तो अगोदरच विवाहित होता आणि त्याला आपल्या पत्नीला धोका द्यायची इच्छा नव्हती.
काही महिन्यापूर्वीच अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरच्या आजारामधून बरी होऊन भारतामध्ये परत आली आहे आणि आता ती स्वस्थ आहे. तिच्यावरती न्यूयॉर्क मध्ये इलाज करण्यात आला आहे. कॅन्सर सारख्या आजारातून ती बाहेर आली आहे. सोनाली बेंद्रेने २००२ मध्ये गोल्डी बहल सोबत लग्न केले होते. गोल्डी एक फेमस फिल्ममेकर आहे. ज्याने अंगारे, बस इतना सा ख्वाब है आणि लंदन पॅरिस न्यूयॉर्क हे चित्रपट डायरेक्ट केले आहेत.

तर दुसरीकडे सुनील शेट्टी एक सक्सेसफुल अ‍ॅक्टर आहे आणि त्याचबरोबर त्याचे बिजनेसवर देखील तितकेच लक्ष असते. तसे तर सुनीलचे विवाहित आयुष्य देखील सफल राहिले आहे आणि त्याला दोन मुले अहान आणि आथिया आहेत. आथिया शेट्टीने हिरो चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे तर सुनीलचा मुलगा अहानसुद्धा बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीमध्ये आहे.